Omraje Nimbalkar Exclusive : आज सोशल मीडिया हे माध्यम असं आहे की, त्यावर तुम्ही काही खोट टाकलं आणि ते खर सांगण्याचा प्रयत्न केला तर पुढच्या काही वेळातच तुम्हाला पार उघड-नागड करून टाकतात ते. (Nimbalkar) शेवटी त्यांच्या या प्रतिवादामुळे आपल्याला तशी काही पोस्ट असेल तर डीलीट करावी लागते असं म्हणत, लेट्सअप मराठीच्या सर्वेत आपल्याला ८३ टक्के लोकांनी जी पसंती दिली त्याचा अर्थ आपण योग्य काम करत असल्याचा दावा आणि विश्वास धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर व्यक्त केला आहे. त्यांनी लेट्सअप मराठीवर खासदारांचे रिपोर्ट कार्ड या खास कार्यक्रमात संवाद साधला. त्यांना अनेक विषयांवर लेट्सअपचे संपादक योगेश कुटे यांनी बोलत केलं आहे.
आता तुमच्या खासदारकीला सहावं वर्ष लागलं आहे. या काळात आपल्याला अस कुठलं काम वाटत ज्यामुळं समाधान आणि आणखी काम करायला स्फुर्ती मिळते असं विचारल्यावर ओमराजे म्हणाले, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाची घोषणा होऊन दहा वर्ष उलटले मात्र, कोणतही काम झालं नव्हत. त्यामध्ये महाविकास आघाडीच सरकार असताना आमदार कैलास पाटील आणि मी सातत्याने पाठपुरावा केल्याने ते मार्गी लागलं आहे. आता लवकरच या प्रकल्पात पाणी येईल असंही ओमराजे म्हणाले आहेत. यामध्ये धाटणीपासून रामधरा प्रकल्पाच्या मधला प्राधान्याक्रम बदलून घेतल्याने हा प्रश्न मार्गी लागला आहे असंही ते म्हणाले.
एकनाथ शिंदेंना ईडीची भीती दाखवून पक्ष फोडला, ओमराजे निंबाळकरांचा गंभीर आरोप
तुळजापूर हे आपलं एक भक्तीचं आणि शक्तीपीठ आहे. ते आजपर्यंत रेल्वे मार्गाला जोडलं नव्हत. अनेकदा पाठपुरावा करूनही ते काही मार्गी लागत नव्हत. पंतप्रधानांनी घोषणा केल्यानंतरही हा प्रश्न काही मार्गी लागत नाही हे लाजीरवाणी बाब होती. मी अनेकदा लोकसभेत हा मुद्दा मांडला. माझी भाषण आजही पब्लीकमध्ये आहेत असं म्हणत आता हे काम सुरू असून येत्या २०२७ ला हा मार्ग पूर्ण होऊन रेल्वे इंजीची ट्राय तेथे होईल असा ठोस दावा करत विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसंच, सुरज चेन्नई मार्ग आहे. मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणजे, लातुरकडं जाणारा मार्ग त्याचाही मुद्दा नितीन गडकरी यांच्याशी बोलून मार्गी लावला असही ते म्हणाले.
तुमच्या जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ड्रग्ज हा मुद्दा गाजला, त्यामध्ये तुमच्या पाठिंब्याचही नाव घेतलं गेल. तसंच, संबंधितांवर गुन्हा दाखल व्हायला का वेळ लागला. त्यावर बोलताना ओमराजे म्हणाले, ज्यावेळी ही गोष्ट मला समजली तेव्हा मी तत्काळ यातील आरोपींवर करड कारवाई व्हावी अशी भूमिका घेतली. तसंच, त्याचा सातत्याने पाठपुरावा केला. दरम्यान, निवडणूक काळात माझ्यासोबत अनेक लोक सेल्फी काढत होते. आता ते लोक मला मतदान करतात. मी त्यांचा खासदार आहे मग मतदारांचा तो हक्के आहे जे माझ्यासोबत फोटो काढतात. मात्र, विरोधकांनी निवडणुकीतील फोटो वापरून आरोप केले. त्यावर माझी आणि त्याची चौकशी करा म्हटलं तर मग कुणीच पुढ आलं नाही असंही ओमराजे म्हणाले.
तसंच, ही कोर्टात केस चालू असताना पोलिसांनी ड्रग्स घेणारे आणि त्याचा व्यापार करणारे अशा दोन टोळ्या आहेत. दरम्यान, यातील विरोधकांच्या गटातील जे लोक आहेत त्यांना वाचवण्याचं काम पोलिसांनी केल. ते इतकं उघड झालं की अखेर कोर्टाने सुनावणीवेळी थेट पोलिसांना विचारलं की तुमच्यावर काही दबाव आहे का असं विचारण म्हणेज हे गंभीर होत असं म्हणत ओमराजे यांनी विरोधकांनी कसं राजकारण केलं हेही सागंण्याचा प्रयत्न केला. तसंच, या विषयावर आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. त्यांनीही सकारात्मकता दाखवली आणि कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. कारण, अशी सामज नासवणारी माणसं समाजात राहण्याच्या लायकीची नाहीत असंही ओमराजे यावेळी म्हणाले.