मुंबई : उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या पुढाकारानने होत असलेल्या विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीची परिषद मुंबईतील ग्रॅंड हयात हॉटेलमध्ये आज आणि उद्या पार पडत आहे. या परिषदेसाठी देशभरातून विरोधी नेत्यांनी हजेरी लावली असून या नेत्यांची संपूर्ण व्यवस्था उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी केली आहे, या परिषदेसाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जात असल्याचा दावा शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. यावेळी बोलताना उदय सामंतांनी खर्चाचे आकडेच सांगितले आहेत.
Adani Group : हिंडेनबर्गनंतर OCCRP ने सादर केला रिपोर्ट; तीन तासांत 35 हजार कोटी स्वाहा!
उदय सामंत म्हणाले, इंडिया परिषदेसाठी मान्यवरांना बसण्यासाठी 45 हजारांच्या 65 खुर्च्या मागवण्यात आल्या असून 14 ते 15 तासांच्या परिषदेसाठी जवळपास कोट्यावधींचा खर्च केला जात आहे, आम्ही गुवाहाटीला गेलो तेव्हा आमच्या हॉटेलचा एकूण खर्च काढण्यात आला होता, आता गॅंड हयातच्या एका खोलीचा दर 25 ते 30 हजार रुपये असून जेवणाचं एक ताट 4500 रुपयांचं असल्याचा दावा उदय सामंतांनी केला आहे. एकूणच इंडिया आघाडीच्या 14 तासांच्या परिषदेसाठी 45 हजारांची खुर्च्या मागवण्यात आल्या आहेत, त्यामुळे विरोधकांना आमच्यावर बोलण्याचा अधिकारच नसल्याचं उदय सामंतांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे.
मनातला मुख्यमंत्री कोण? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांनी एकदाचं सांगूनच टाकलं…
यावेळी बोलताना उदय सामंत यांनी विरोधकांच्या परिषदेवर सडकून टीका केल्याचं पाहायला मिळालं आहे. ते म्हणाले, मुंबईत असंतुष्टांचा मेळावा भरतोय. देशाचं नाव राजकारणासाठी वापरणं हे दुर्दैवी असून लोकसभा निवडणुका झाल्यावर इंडिया संपुष्टात येणार असल्याचं उदय सामंत म्हणाले आहेत.
‘वंचित’ची ‘इंडिया’ आघाडीत एन्ट्री होणार? काँग्रेससमोरच ठाकरेंनी काय ‘ते’ स्पष्टच सांगितले
ग्रॅंड हयात हॉटेलच्या खोलीचं खरं भाडे किती?
ग्रॅंड हयात हॉटेल हे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या जवळ वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये असून 10 एकरामध्ये पसरलेले आहे. परदेशी पर्यटक, बॉलिवूड कलाकारांचं हे आवडतं हॉटेल असल्याचं बोललं जातं. हॉटेलमध्ये 548 खोल्या आहेत. हॉटेलमध्ये चार रेस्टॉरंट्स आहेत. या हॉटेलमध्ये अनेक सूट, खोल्या आणि अपार्टमेंट उपलब्ध आहेत. सुइट्सच्या बाबतीत, हॉटेलमध्ये डिप्लोमॅटिक स्वीट, ग्रँड एक्झिक्युटिव्ह सूट, ग्रँड सूट किंग, प्रेसिडेंशियल स्वीट, यांचा समावेश आहे.
डिप्लोमॅटिक सूटचे एका दिवसाचे भाडे 34,500 रुपये असून विविध करांसह 40,710 रुपये इतके आहे. हॉटेलमधील प्रेसिडेंशियल सूटच्या एका रात्रीची किंमत 299,000 रुपये असून कर शुल्कासह 352,820 रुपये इतकी आहे. यामध्ये 12 वेगवेगळ्या प्रकारच्या खोल्या आणि आठ प्रकारच्या अपार्टमेंटचाही समावेश आहे. यामध्ये एका दिवसाचे खोलीचे भाडे 11,000 ते 14,500 रुपयांपर्यंत आहे. विविध करांसह हे भाडे 12,980 ते रु. 17,110 इतके आहे. अपार्टमेंट्समधील एका बेडरूमचे भाडे 34,000 रुपये असून कर शुल्कासह ते 40,120 रुपयांपर्यंत आकारले जाते. यासंदर्भातील माहिती ग्रॅंड हयात हॉटेलच्या वेबसाईने दिली आहे.
‘इंडिया’ आघाडीत ठाकरे गट 26 व्या स्थानावर :
हॉटेलमध्ये गेलेल्या यादीनूसार इंडिया आघाडीमध्ये 25 व्या नंबरवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असून उद्धव ठाकरे गट 26 व्या स्थानावर आहे. महाराष्ट्रातील दोन महत्वाचे पक्ष शेवटून दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असल्याची टीका उदय सामंत यांनी केली आहे.
दरम्यान, इंडिया आघाडीच्या परिषदेत चिन्ह आणि जागावाटपावर महत्वपूर्ण चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे. यासोबतच भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांची वज्रमूठ आणखीन मजबूत करण्यासाठीच ही बैठक संपन्न होत आहे. अशातच सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून विरोधकांच्या बैठकीवर निशाणा साधून टीका-टीप्पणी करण्यात आहे. बैठकीनंतर इंडिया आघाडीकडून सत्ताधाऱ्यांच्या टीकेला काय प्रत्त्युत्तर देण्यात येणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.