Onion Price Hikes : दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईत सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारी खरेदीला वेग आण्यासाठी आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य भाव मिळण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने राखीव साठ्यासाठी कांद्याच्या खरेदी दरामध्ये तब्बल 13 टक्क्यांची घसरण मागे टाकत मोठी वाढ केली आहे. माहितीनुसार, आता सरकारी केंद्रावर कांद्याला प्रति क्विटल 2,125 रुपये म्हणेज 21.25 रुपये प्रति किलो भाव मिळणार आहे. नवीन दर 4 जुलै 2026 पासून संपूर्ण देशभरात लागू होणार आहे. तर यापूर्वी हा दर 1,875 रुपये प्रति क्विटल इतका होता.
पाचव्यांदा दरवाढ
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत यावर्षी सरकारी पातळीवर कांद्याची (Onion Price Hikes) खरेदी खूप कमी होत आहे. बाजार भाव आणि सरकारी दरामधील फरकामुळे सरकारला 1 जूनपासून फक्त 2 हजार टन कांदा खरेदी करता आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत या हंगामात पाचव्यांदा खरेदी दरात वाढ केली आहे.
हंगामाच्या सुरुवातील सरकारी खरेदीचा दर फक्त 2.70 रुपये प्रति किलो इतका होता मात्र यानंतर 22 मे रोजी भाव 15.80 रुपये करण्यात आला. यानंतर 13 जून रोजी 16.50 रुपये तर 20 जून रोजी 17.30 आणि यानंतर 18.75 तर आता 21.25 रुपये प्रति किलो भाव करण्यात आला आहे. तर दुसरीकडे कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार , यंदा देशात 307.37 लाख टन काद्यांचे उत्पादन होऊ शकते. सध्या देशात कांद्याची टचाई नसून महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यांमध्ये कांद्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
तर देशभरातील बाजार समित्यांमध्ये दररोज 50 हजार टनांपेक्षा जास्त कांद्याची आवक होत आहे. यापैकी 60 आवक महाराष्ट्रातून होत आहे. राज्यातील बाजारात सध्या कांद्याला सरासरी 18 रुपये प्रति किलोचा भाव मिळत असून देशभरात कांद्याचा सरासरी किरकोळ विक्री दर 31 रुपये प्रति किलोच्या आसपास असल्याची माहिती आहे.
भारतात पुढील सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण कधी दिसणार ? जाणून घ्या सर्वकाही
व्यापाऱ्यांकडून कांद्याची साठवणूक
तर दुसरीकडे यंदा मान्सूनचे देशात आगमन उशिरा झाल्याने काही भागात कमी पाऊस पडताना दिसत आहे. त्यामुळे नाशिक आणि मध्य प्रदेशातील काही बाजरपेठांमध्ये व्यापाऱ्यांकडून कांद्याची साठवणूक करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. व्यापाऱ्यांकडून सध्या चांगल्या दर्जाचा कांदा साठवून ठेवला जात आहे. साठवणूक केलेला कांदा सणासुदीच्या काळात किंवा टचाईच्या काळात बाजारात आणण्याचा व्यापारांचा विचार आहे.
