दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यावरच आपण रिटायर्ड व्हायचं; पंकजा मुंडेंच्या निशाण्यावर नेमकं कोण?

Pankaja Munde पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण आलं असून, त्यांच्या निशाण्यावर नेमकं कोण याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत.

Pankaja Munde

Pankaja Munde Speaks About Her Retirement : भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या “दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर्ड व्हायचं” या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. केज येथील कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी आपल्या राजकीय निवृत्तीच्या चर्चांना स्पष्टपणे फेटाळून लावलं. मात्र, याचवेळी त्यांनी केलेल्या या सूचक वक्तव्यामुळे आता नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

शाहरुख खानची उडाली घाबरगुंडी, ‘मन्नत’ बंगल्यात दोन साप, वन विभागाची धावपळ

‘रिटायर्ड काय व्हायचं? मी चांगली खमकी आहे’

पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी कुठेही जात नाही, इथेच आहे. कुणीतरी बातमी दिली की ताई रिटायर्ड होणार. काही रिटायर्ड वगैरे होत नसते. मी चांगली खमकी आहे. मला कुठे काय झालंय? रिटायर्ड काय व्हायचं आहे?”

केंद्राच्या करकपातीनंतरही ग्राहकांना दिलासा नाही, मुंबईत पेट्रोल 111.21, तर डिझेल 97.83 रुपये लिटर

यानंतर त्यांनी, “दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर्ड व्हायचं, आधी नाही,” असं म्हटलं. या वक्तव्यामुळे पंकजा मुंडेंच्या निशाण्यावर नेमके कोण आहेत, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

अजूनही काम करण्याची क्षमता

आपलं वय 47 वर्षे झालं असलं तरी आपल्यात अजूनही काम करण्याची मोठी क्षमता असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. त्यामुळे राजकारणातून निवृत्ती घेण्याचा कोणताही विचार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, “दोन-चार जणांना रिटायर्ड केल्यानंतर…” या विधानामुळे त्यांनी कोणत्या राजकीय नेत्यांकडे किंवा विरोधकांकडे अप्रत्यक्षपणे इशारा केला, याची चर्चा रंगली आहे.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर झारखंड सरकार झुकले ! JSSC-CGL परीक्षा रद्द; हेमंत सोरेन यांची घोषणा

वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला उधाण

पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्याचा संदर्भ नेमका कोणत्या राजकीय घडामोडींशी आहे, हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे त्यांच्या विधानामागे नेमका कोणता राजकीय संदेश आहे, याबाबत तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. आगामी काळात त्यांच्या या वक्तव्यावर कोणत्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

follow us