मुंबई : केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करुन आमचं संघटन तोडल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी आरोप केले आहेत. सत्तासंघर्षानंतर शिवसेनेच्या दोन गटांत विभागणी झालीय. त्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटामध्ये खडाजंगी सुरु आहे. अशातच खासदार राऊतांनी हे गंभीर आरोप केले आहेत.
उर्फी जावेदने दिली गुड न्युज, घरी येणार नवीन सदस्य
संजय राऊत म्हणाले, दिल्लीत ठाकरे गटाचं स्थान महत्वाचं आहे. देशातील विरोधी पक्षांचा उद्धव ठाकरेंवर विश्वास आहे. विरोध नेत्यांमध्ये ठाकरे हे विश्वासू नेते आहेत. संकटं आली की ठाकरे लढतातच. सध्या सुरु असलेल्या राजकारणात काहीही घडू शकते, असं भाकीतही त्यांनी यावेळी केलंय.
Nawab Malik : नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर
तसेच पंतप्रधान नंतर ठरवू पण आधी एकजूट होणं गरजेचं आहे. आपण एकत्र असायला हवं, त्यासाठी उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न सुरु असल्याचं त्यांनी म्हटलंय.
देशातल्या राष्ट्रीय राजकारणात शिवेसेनेचा मोठा सहभाग आहे. एकीकडे उद्धव ठाकरेंकडून विरोधकांना एकत्र आणण्याचं प्रयत्न सुरु आहे तर दुसरीकडे शिवसेनेचं संघटन तोडण्याचा प्रयत्न केंद्रीय यंत्रणांकडून सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अवघ्या दीड लाखात खरेदी करा TATA ची भन्नाट कार
दरम्यान, विरोधक एकत्र आल्यास 2024 साली पार पडणाऱ्या निवडणुकीत लढाई सोपी होणार असल्याचा विश्वासही संजय राऊतांनी यावेळी व्यक्त केला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रस्सीखेच रणनीती आखणं सुरु असल्याचं दिसून येतंय.
निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच शिंदे गटाकडून आशीर्वाद यात्रा तर ठाकरे गटाकडून शिवगर्जना यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत.