Pandharpur Well Collapse Accident: पंढरपूरमधील आंबे या गावात विहिरीचे खोदकाम सुरू असताना मोठी दुर्घटना घडली आहे. विहिरीचा काही भाग अचानक कोसळल्याने त्याच्या ढिगाऱ्याखाली 4 मजूर अडकले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवताना पाच चुका टाळा, अन्यथा व्याजातून होणारी कमाई घटेल ?
शेतकरी निवास शिंदे यांच्या विहिरीचे खोदकाम सुरू असताना ही दुर्घटना घडली. विहिरीचा काही भाग अचानक कोसळला आणि त्याखाली काम करणारे 4 मजूर गाडले गेले. घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. जेसीबीच्या मदतीने ढिगारा बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ढिगारा मोठ्या प्रमाणात असल्याने बचावकार्यात अडचणी येत आहेत.
NDRF च्या टीमला पाचारण
जेसीबी आणि इतर यंत्रांच्या मदतीने ढिगारा हटवण्याचे काम सुरू असले तरी अद्याप एकाही मजुराला बाहेर काढण्यात यश आलेले नाही. त्यामुळे प्रशासनाने बचावकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) टीमला बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. संध्याकाळपर्यंत NDRF ची टीम घटनास्थळी पोहोचण्याची अपेक्षा आहे.
भारताने न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका 3-1 ने जिंकली; पाचव्या वनडेत 22 धावांनी धूळ चारली!
तोपर्यंत उपलब्ध यंत्रसामग्रीच्या मदतीने ढिगारा हटवण्याचे प्रयत्न सुरू राहणार आहेत. या दुर्घटनेत अडकलेल्या चारही मजुरांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यांची स्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
