गेल्या अनेक दिवसांत कट्टर विरोधक म्हणून वावरणारे धस अन् पंकजा मु्ंडेंचा एकाच गाडीत प्रवास

आणखीही सुरू आहे असं सध्याचं चित्र आहे. दरम्यान, आज पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याचं पाहायला मिळालं.

गेल्या अनेक दिवसांत कट्ट्रर विरोधक म्हणून वावरणारे धस अन् पंकजा मु्ंडेंचा एकाच गाडीत प्रवास

गेल्या अनेक दिवसांत कट्ट्रर विरोधक म्हणून वावरणारे धस अन् पंकजा मु्ंडेंचा एकाच गाडीत प्रवास

Suresh Dhas Vs Pankaja Munde : गेली अनेक दिवसांपासून एका पक्षात असतानाही मोठ युद्ध सुरू असलेले दोन नेते आज ऐकत्र पाहायला मिळाले. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर थेट टीका केली आहे. तसच, धस यांचा विजय झाल्यानंतर लगेच झालेल्या (Suresh Dhas) सभेत त्यांनी पंकजा मुंडे यांनी आपल्याशी गद्दारी केली अशी तोफ टाकली होती. त्यानंतर जो विषय सुरू झाला तो आणखीही सुरू आहे असं सध्याचं चित्र आहे. दरम्यान, आज पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याचं पाहायला मिळालं.

खुंटेफळ सिंचन प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. त्यावेळी पंकजा मुंडेही यावेळी उपस्थित होत्या. यावेळी हेलिपॅडवर उतरल्यानंतर मंत्री पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांनी कार्यक्रमाच्यास्थळी जाईपर्यंत एका गाडीतून प्रवास केला. या घटनेनंतर गेली अनेक दिवसांपासून सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये चाललेल राजकीय युद्ध नरम होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.

Exit mobile version