बीड : एकनाथ शिंदे आणि अजितदादांच्या हातमिळवणीमुळे भाजपची ताकद वाढली आहे. मात्र, शिंदे आणि अजितदादांच्या भाजपसोबत आल्याने मला मतदार संघ राहिलेला नाही असा नाराजीचा सूर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी निवडणूक कोणतीही असो, माझ्या नावाची चर्चा होतेच असे विधानदेखील केले आहे. बीड जिल्ह्यात गाव चलो अभियानात सहभागी झाल्यानंतर त्या बोलत होत्या. (Pankaja Munde On Rajyasabha Election & Constitution)
नागवडेंच्या हातात ‘घड्याळ’; पाचपुतेंचे विधानसभेचे तिकीट हुकणार?
पंकजांच्या मनात राज्यसभा की लोकसभा?
माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान पंकजा मुंडेंनी राज्यसभेच्या उमेदवारीबाबत भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या की, राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत माझं नाव चर्चेत होतं. यात नावीन्य असे काही नाही. लोकांना मला कुठे पाहायला आवडेल हा महत्त्वाचा विषय आहे. त्यांना जिथे पाहिजे तिथे मी दिसली तर फार मोठी गोष्ट आहे असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
भाजपनं दिल्लीला धाडली नऊ जणांची यादी
राज्यसभेसाठी येत्या 27 फेब्रुवारीला निवडणूक (Rajya Sabha Election) होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. या सहा जागांपैकी तीन जागा भाजपाच्या वाट्याला येणार आहेत. या जागांसाठी भाजपकडून कोण उमेदवार असतील याची चर्चा सुरू असतानाच नऊ उमेवारांची यादी दिल्लीला धाडण्यात आली आहे.
लगेच सरकार बरखास्त करा, काय पोरखेळ आहे का? अजितदादा विरोधकांवर कडाडले!
पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवणार का? असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी पंकजा मुंडे आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत. त्यांच्याबरोबरील भेटीत राजकीय चर्चा झाली. परंतु, राज्यसभेसंदर्भात चर्चा झाली नाही. पंकजांना कोणतं पद द्यायचं, कोण राज्यसभा किंवा लोकसभेत जाईल याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेतात असे फडणवीसांनी स्पष्ट केले.
भाजपच्या यादीत कुणा-कुणाची नावे?
भाजपकडून दिल्लीत पाठवण्यात आलेल्या संभव्या उमेदवारांच्या नावांच्या यादीत नारायण राणे, विनोज तावडे, पंकजा मुंडे, विजया रहाटकर, अमरीश पटेल, माधव भंडारी, चित्रा वाघ, हर्षवर्धन पाटील आणि संजय उपाध्याय यांच्या नावांचा समावेश आहे. यापैकी आता कोणत्या नेत्याला ग्रीन सिग्नल मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र, त्या आधी शिंदे आणि अजितदादा भाजपसोबत आल्याने मला मतदारसंघच उरला नसल्याची मनातली खंत पंकजा यांनी बोलून दाखवली आहे.
‘आईवडील मला मतदान करणार नसतील तर दोन दिवस जेवू नका; संतोष बांगरांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला
राज्यातील सहा जागांपैकी तीन जागा भाजप लढवील. एक जागा शिवसेना आणि एक जागा अजित पवार गटाला दिली जाईल. चौथी जागा भाजप लढवील याची शक्यता नाही. जर महाविकास आघाडीने उमेदवार दिला तर मग आपणही चौथा उमेदवार द्यायचा असे भाजपाचे ठरले आहे. निवडणुकीआधी काँग्रेसमधील आमदारांचा गट भाजपात आला तर भाजप चौथी जागा लढेल अशी चर्चा आहे.