डॉ. गौरी पालवे आत्महत्या प्रकरणी रात्री उशीरा पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला अटक

Pankaja Munde यांच्या पीए अनंत गर्जेच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आता यामध्ये पती अनंत गर्जेला पोलिसांनी अटक केली आहे.

Pankaja Munde

Pankaja Munde

Pankaja Munde’s PA Anant Garje arrested late at night in connection with Dr. Gauri Palve’s suicide case : राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वरळीतील राहत्या घरी अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी गळाफास घेत आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर या प्रकरणामध्ये नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता या प्रकरणामध्ये पती अनंत गर्जे याला पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकं प्रकरणं काय?

राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी पालवे (Gauri Palve) यांचा 7 फ्रब्रुवाारी रोजी लग्न झाला होता. डॉक्टर गौरीने राहत्या घरी शनिवार 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता घरात गळाफास घेऊन आत्महत्या केली. तर डॉक्टर गौरी यांचा सासरच्या मंडळींकडून छळ करण्यात येत होता असा आरोप गौरी यांच्या कुटुंबियांनी केला आहे.

चित्रपट निर्मितीच्या सुविधा आता एकाच छताखाली; फिल्मसिटीमध्ये कॅमेरा टू क्लाउड व्यवस्था उभारणार

दरम्यान या प्रकरणात वरळी पोलिसांनी (Worli Police) अपमृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याच दरम्यान आता या प्रकरणामध्ये पती अनंत गर्जे याला पोलिसांनी अटक केली आहे. रात्री एक वाजेच्या सुमारास गर्जे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर आज त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. यामध्ये अनंत गर्जेस त्याची बहिण शितल आणि भाऊ अजय विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंत्री पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

या प्रकरणावर पंकजा मुंडे यांनी माध्यमांसाठी प्रेस नोट काढली आहे. त्यात त्या म्हणतात, 22 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 6.30 ते 6.45 वाजण्याच्या सुमारास माझा पीए अनंतचा फोन माझ्या दुसऱ्या पीएच्या फोनवर आला. तो खूप रडत होता . पत्नीने आत्महत्या केल्याचे अत्यंत आक्रोशाने त्याने मला सांगितले. ही गोष्ट माझ्यासाठी ही खूप धक्कादायक होती, अशी भावना पंकजा मुंडे यांची आहे.

Exit mobile version