Download App

दोषीला शिक्षा दिल्याशिवाय शांत बसणार नाही; ‘भीमसैनिकाच्या’ मृत्यूनंतर आंबेडकरांनी डरकाळी फोडली

परभणीतील भीमसैनिकाच्या मृत्यूला दोषी असणाऱ्याला शिक्षा दिल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी डरकाळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी फोडलीयं.

Prakash Ambedkar Speak On Bhimsainik Somnath Suryawanshi Death : परभणीतील भीमसैनिकाच्या मृत्यूला दोषी असणाऱ्याला शिक्षा दिल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी डरकाळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी फोडलीयं. परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर हिंसाचार उफाळ्याचं पाहायला मिळालं. या हिंसाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या सोमनाथ सुर्यवंशी (Somnath Suryawanshi) या भीमसैनिकाचा पोलिस कस्टडीत मृत्यू झाला. या प्रकरणानंतर खुद्द आंबेडकर स्वत: भीमसैनिकाच्या अंत्यविधीसाठी परभणीत दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधलायं.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, परभणीत आंदोलन सुरु असताना पोलिस खात्यातील अधिकाऱ्यांमध्ये कुठलाही समन्वय नव्हता. पोलिसांकडून सर्वसामान्य माणसांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली. यावेळी पोलिसांनी पुतळ्याच्या परिसरातील मॉप हटवण्यासाठी लाठीचार्ज केला तो मान्य मात्र परिसरापासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या नागरिकांनाही पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केलीयं. एवढचं नाही तर दलित वस्त्यांमध्ये जात लोकांची घरे फोडण्यात आली. पोलिसांना कोणाचीही घरे फोडण्याचा अधिकार नाही, भीमसैनिकाचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचं शव विच्छेदन अहवालात समोर आलंय, त्यामुळे जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा दिल्याशिवाय शांत बसणार नसल्याचं आंबेडकरांनी स्पष्ट केलंय.

पोलिस कस्टडीत असताना भीमसैनिकाचा मृत्यू झालायं, ही घटना घडताच मी पोलिस महासंचालकांशी संवाद साधून शव विच्छेदन संभाजीनगरच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये व्हावा, अशी मागणी केली. त्यानूसार शवविच्छेदन करण्यात आलं. या शव विच्छेदनामध्ये मारहाणीमुळेच सुर्यवंंशीचा मृत्यू झाला असल्याचं स्पष्ट झालं असल्याचं
प्रकाश आंबेडकरांनी यावेळी म्हटलंय.

मंत्रिमंडळ विस्तारात नगरकरांच्या पदरी निराशा! जिल्ह्यात फक्त विखेच एकमेव मंत्री

शवविच्छेदनाच्या नियमांमध्ये फॉरेन्सिकचा समावेश करा
देशात जिवंत माणसाला महत्व पण मेलेल्या माणसाला दिलं जात नाही. अपघाती मृत्यू झाल्यानंतर मृत व्यक्तीचं शवविच्छेदन फॉरेन्सिक आणि पॅथॉलॉजी या दोन्ही पद्धतीने करण्यात यावा, यामध्ये एमआरआय, सिटीस्कॅनही करण्यात यावेत. याचं कारण म्हणजे व्यक्तीला काय काय जखमा आहेत, याबाबत स्पष्टता येते असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

दोन मराठ्यांच्या भांडणात सरपंच पतीची हत्या….
बीडमध्ये एका सरपंच पतीची हत्या करण्यात आली. ही हत्या दोन मराठयांच्या भांडणामध्ये झाली असून या हत्येवर अद्यापही बीडमध्ये शांतताच आहे. हे एक गुढ असून बीडचे लोकं शॉकमध्ये आहेत. कोणीच काही बोलायला तयार नाही काहीच सांगायला तयार नाही, विषय काढला की लोकं रामराम करतात, असंही आंबेडकर म्हणाले आहेत.

धर्म अन् द्वेष पेरल्याने तेच उगवणार…
देशात सत्ताधाऱ्यांकडून लोकांमध्ये धर्म आणि द्वेष पेरलायं. त्यामुळे लोकं आता बेकाबू झाले आहेत. त्यामुळे लोकांच्या डोक्यात द्वेष आणि धर्म हेच उगवणार आहे. काहींनी कायदा आपल्या हाती घेतला कायदा हाती घेऊन त्यांनी लोकांना मारायला सुरुवात केली ही परिस्थिती या देशात वाढतच जाणार. हे थांबेल असं नाही हे थांबवण्यासाठी लोकांनी व्यसने सोडून प्रशासकीय यंत्रणेत सामिल व्हायला हवं, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

follow us