Pankaja Munde : भाजपच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज (Munde) पाठवून आणि कॉल करुन त्रास देणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अमोल काळे असं आरोपीचं नाव असून तो परळीचा रहीवाशी आहे.
गेल्या काही दिवसांपासून तो पंकजा मुंडेंना कॉल आणि मेसेजद्वारे त्रास देत होता. या प्रकरणी पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाने सायबर पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सायबर पोलिसांनी बीएनएसच्या कलम ७८ आणि ७९ तसंच आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. सायबर पोलिसांनी भोसरी पोलिसांच्या मदतीने आरोपी अमोल काळेला अटक केली.
संतोष देशमुख यांची हत्या झाली, तशी दुसरी घटना पुन्हा पंकजा मुंडे बीड जिल्ह्याबाबत काय म्हणाल्या?
आरोपी अमोल काळे पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज आणि कॉल करुन त्रास देत होता. याप्रकरणी पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाकडून जवळच्या सायबर पोलीस स्थानकांत संपर्क करुन आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सायबर पोलिसांनी बीएनएसच्या कलम 78 आणि 79 तसेच आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आणि पुढील तपास सुरू केला. त्यानंतर सायबर पोलिसांनी भोसरी पोलिसांच्या मदतीने आरोपी अमोल काळेला अटक केली.
चौकशीत काळेने पंकजा मुंडे यांना फोन केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. अमोल काळेला न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. एका सायबर अधिकाऱ्याने सांगितलं की, आरोपी हा विद्यार्थी आहे आणि त्याने अपशब्द वापरण्यामागील आणि त्रासदायक वर्तनामागील हेतू सध्या तपासला जात आहे. मात्र, त्याला पुण्यातील भोसरी येथून अटक करण्यात आली. आरोपी अमोल काळे हा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील परळी येथील रहिवासी आहे.