Parner Vidhansabha Election 2024 : शिवसेना (Shivsena) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष फुटीनंतर पहिल्यांदा होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. लोकसभेच्या निकालानंतर राज्यातील राजकीय गणित पूर्णपणे बदलेली आहे. त्यामुळे आता विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या देखील वाढली आहे.
नगर जिल्ह्यातील सध्या स्थितीला अत्यंत चर्चेचा असलेला पारनेर मतदारसंघातून (Parner Vidhansabha) आता महाविकास आघाडी (MVA) व महायुतीमधून (Mahayuti) इच्छुक उमेदवारांची नावे समोर आली आहे. इच्छुक उमेदवारांची यादी पाहता आघाडी व महायुतीमध्ये चांगलीच रस्सीखेच होणार असे चित्र सध्या पारनेर तालुक्यात निर्माण झाले आहे.
पारनेर तालुक्यात नुकतेच महायुतीची एक महत्वाची बैठक पार पडली. यामध्ये महायुतीचे घटक पक्ष भाजप, शिवसेना, एकनाथ शिंदे (गट) , राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. एकीकडे विधानसभेच्या अनुषंगाने महायुतीकडून तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून देखील इच्छुक शिलेदार मतदारांच्या भेटीगाठी घेत आहे. ठाकरे गटाकडून सध्या मशाल यात्रेचे नियोजन तालुक्यात केलं आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून देखील मोर्चेबांधणी सुरु आहे. महायुतीकडून हे उमेदवार इच्छुक आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने पारनेरमध्ये देखील इच्छुक उमेदवारांकडून हालचाली सुरु आहे. विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून उमेदवारांकडून आपला जनसंपर्क वाढवण्याचे काम सुरु आहे. यातच पारनेरमध्ये महायुतीकडून पाच इच्छुक उमेदवारांची नावे विधानसभेसाठी समोर आली आहे. यामध्ये काशिनाथ दाते, विश्वनाथ कोरडे, सुनील थोरात, सुजित झावरे यांच्यासह प्रशांत गायकवाड इच्छुक आहे.
महाविकास आघाडीकडून हे उमेदवार इच्छुक
पारनेर मतदारसंघ हा राष्ट्रवादीकडं आहे. यामुळे या जागेवर शरद पवार उमेदवार देतील अशी चर्चा आहे. मात्र असे असले तरी शिवसेना ठाकरे गट देखील या जागेवर दावा करत आहे.
बांगलादेशचा ताबा लष्कराच्या हाती , पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा, देश सोडला
सध्या महाविकास आघाडीकडून संदेश कार्ले, श्रीकांत पठारे, (दोघे ठाकरे गट) हे इच्छुक आहे. तर राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचे नाव देखील विधानसभेसाठी चर्चेत आहे. शरद पवार गटाकडून त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात आहे.