मोठी बातमी! पवनराजे निंबाळकर हत्याकांडाची तारीख बदलली; आता ‘या’ तारखेला लागणार निकाल

मुंबईतील विशेष न्यायालयाकडून आज निकाल जाहीर होण्याची शक्यता होती, मात्र कोर्टाने आज निकाल दिला नाही.

News Photo   2026 06 16T122942.990

मोठी बातमी! पवनराजे निंबाळकर हत्याकांडाची तारीख बदलली; आता 'या' तारखेला लागणार निकाल

पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात (Court) आज 16 जून रोजी मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाकडून आज निकाल जाहीर होण्याची शक्यता होती, मात्र कोर्टाने आज निकाल दिला नाही. या प्रकरणाचा निकाल 20 जूनला लागणार असल्याचे समोर आले आहे.

काय घडलं?

आज विशेष सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सर्व ९ आरोपी कोर्टात हजर होते. यामध्ये मुख्य आरोपी आणि माजी खासदार पद्मसिंह पाटील यांचा समावेश आहे. तब्येत ठीक नसल्याने पद्मसिंह पाटील रुग्णवाहिकेद्वारे कोर्टात हजर झाले. मात्र, दीर्घ प्रतीक्षेनंतरही न्यायालयाने आज निकाल जाहीर केला नाही. निकाल तयार करण्यासाठी आणखी काही दिवसांची गरज आहे, असं स्पष्ट करत न्यायधीशांनी या प्रकरणाचा निकाल 20 जूनला देणार असल्याचं सांगितलं.

पवनराजे निंबाळकर थरारक हत्या प्रकरणाचा आज निकाल, 20 वर्षांनंतर ओमराजेंच्या वडिलांना न्याय मिळणार?

20 जूनला लागणार निकाल

पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येची घटना तब्बल २० वर्षांपूर्वी घडली होती. या खटल्यामध्ये माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण ९ जणांवर आरोप आहेत. या प्रकरणात गेल्या दोन दशकांत अनेक वेळा सुनावण्या झाल्या, साक्षीदारांच्या जुळवणी, याचिका आणि विलंब यामुळे खटला लांबत गेला. निकालाची सुनावणी सुरू होण्यापूर्वी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

ओमराजे निंबाळकरांनी व्यक्त केल्या भावना

माझे वडील पवनराजे निंबाळकर साहेब व त्यांचे चालक समद काझी यांची निष्ठूर हत्या होऊन सुमारे 20 वर्षे झाली. अजूनही आम्ही दोन्ही कुटुंबीय न्याय होण्याच्या प्रतीक्षेत आहोत. आज न्यायदेवता न्याय करणार आणि ज्यांनी रक्ताच्या नात्याला काळीमा फासला अश्याचा आज फैसला होणार ही अपेक्षा. हा खटला म्हणजे मस्तवाल राजकीय शक्ती व पैशाच्या मस्तीवर लोकांना गुलाम समजणाऱ्या, त्यांच्या जीवाची किंमत नसणाऱ्या, रक्ताच्या नात्याचा घात करणाऱ्या मानसिकतेविरुद्ध हा संघर्ष आहे असे ओमराजे निंबाळकर म्हणाले.

Exit mobile version