मुंबई : बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल रमेश बैस यांनी शेजारी बसून भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय क्रिकेट सामना पाहण्याचा आनंद लुटला आहे.
आता इस्टावरही पीएफची माहिती मिळणार…
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अनेकदा वादात अडकले होते. वादग्रस्त विधानांमुळे राज्यपाल चर्चेत आले होते. त्यानंतर आता विद्यमान राज्यपाल रमेश बैस यांच्या शेजारी बसून शरद पवार सामन्याचा आनंद लुटत असल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मोठी बातमी! देशातल्या 56 कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पंचवार्षिक निवडणुका रद्द…
तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही हा सामना पाहण्याचा मोह आवरला नसून पवार आणि फडणवीसही शेजारी बसून सामना पाहत असल्याचं दिसून आले आहेत.
Air India : नॉन फ्लाइंग कर्मचार्यांना स्वेच्छानिवृत्तीची ऑफर : ३० एप्रिलपर्यंतच मुदत!
एकीकडे राज्याच्या राजकारणात एकमेकांचे विरोधक म्हणून पाहिले जात असतानाच रोहित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र बसून सामना पाहण्याचा आऩंद लुटत असल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगलीय.
दरम्यान, मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर शरद पवार यांच्यासह अऩेक कलाकारांनी हजेरी लावत सामना पाहण्याचा आनंद लुटला आहे. यामध्ये विशेषत: सुपरस्टार रजनीकांत उद्योजक आनंद महिंद्रा अजय देवगण, माजी क्रिकेटर मोहम्मद अझीरुद्दीन, गौरव तनेजा, रितू राठी, आदी कलाकारांनी सामन्याचा आनंद लुटला आहे.