Air India : नॉन फ्लाइंग कर्मचार्‍यांना स्वेच्छानिवृत्तीची ऑफर : ३० एप्रिलपर्यंतच मुदत!

Air India : नॉन फ्लाइंग कर्मचार्‍यांना स्वेच्छानिवृत्तीची ऑफर : ३० एप्रिलपर्यंतच मुदत!

मुंबई : एअर इंडियाने (Air India) आपल्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीची (Voluntary Retirement to Non-Flying Staff) आँफर पुन्हा एकदा दिली आहे. १७ मार्चपासून येत्या ३० एप्रिल २०२३ पर्यंत यासाठी मुदत देण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. १७) रोजी एअर इंडियाने नॉन फ्लाइंग कर्मचार्‍यांसाठी स्वेच्छानिवृत्तीची ऑफर पुन्हा एकदा दिली आहे. मागील वर्षी जानेवारी २०२२ मध्ये टाटा समूहाने एअर इंडियाचा ताबा घेतल्यानंतर याप्रकारची ऑफर दुसऱ्यांदा देत आहे.

यापूर्वी एअर इंडियाकडून जून २०२२ मध्ये पहिल्यांदा स्वेच्छानिवृत्तीची ऑफर दिली होती. स्वेच्छा निवृत्तीची ऑफर इतर कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांसाठीही लागू करावी अशी कर्मचाऱ्यांना केली होती. त्याला प्रतिसाद देत एअर इंडियाने पुन्हा एकदा ही संधी उपलब्ध करुन दिली आहे. या ऑफरमध्ये पूर्वी ४२०० कर्मचाऱ्यांपैकी १५०० कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला आहे.

Sanjay Kakade यांना दणका : कर्ज थकल्याने संपत्ती जप्त करण्याचा न्यायालयाचा आदेश

एअर इंडियाती ही ऑफर जनरल कॅडरमध्य काम करणाऱ्या कायमस्वरुपी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी  लागू करण्यात आली आहे. ज्यांचे वय ४० वर्षे किंवा त्याहून अधिक आहे. तसेच किमान पाच वर्षे त्यांनी सेवा केली आहे. त्याचबरोबर लिपिक आणि अकुशल श्रेणीतील कर्मचाऱ्यांनाही या संधीचा लाभ घेला येणार आहे. परंतु, त्यासाठी किमान पाच वर्षे त्यांनी सतत सेवा पूर्ण केली आहे. तेही देखील पात्र धरण्यात येणार आहे.

एअर इंडियाने या ऑफरसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदर दिली आहे. एअर इंडियाचे २१०० कर्मचारी याच्या कक्षेत येत आहेत. सध्या फ्लाइंग आणि नॉन फ्लाइंग स्टाफसह ११ हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. एअर इंडियाने कर्मचार्‍यांना पाठवलेल्या संदेशात म्हटले की ३१ मार्च २०२३ पर्यंत जो कोणी कर्मचारी यासाठी अर्ज करतील. फक्त त्यांनाच एक्स-ग्रेशिया व्यतिरिक्त एक लाख रुपये देण्यात येणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube