Download App

VIDEO : वनताराच्या सल्लागार मंडळावर पेटाचे पदाधिकारी! राजू शेट्टींचा खळबळजनक खुलासा

Raju Shetty On Mahadevi Elephant : कोल्हापूरमधील (Kolhapur) नांदणी मठातील माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीण (Mahadevi Elephant) पुन्हा मठात येण्याचा तोडगा निघालाय. हा वाद जवळजवळ संपला असला तरी पेटाच्या भूमिकेवर माजी खासदार राजू शेट्टी यांनी शंका उपस्थित केलीय. वनतारासाठी (Vantara) पेटा काम करत आहे. पेटाला (PETA) पैसे कुठून येतात, असा सवाल राजू शेट्टी यांनी (Raju Shetty) लेट्सअपला दिलेल्या मुलाखतीत उपस्थित केलाय. त्यांनी अनेक प्रश्नांवर त्यांनी सडेतोड उत्तरे दिली.

वनतारा, नांदणी मठ अन् शासन

महादेवी हत्तीणीला पुन्हा आणण्यात शंभर टक्के यशस्वी झालेलो नाही. मामला सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारित आहे. वनतारा, नांदणी मठ अन् शासन या तिघांनी एकत्रित सुप्रीम कोर्टात जायचं आहे. मठाच्या परिसरातच महादेवीच्या देखभालीचं शेल्टर उभं करायचं. त्याची मालकी मठाची राहील, असं समझौता झालाय. राजू शेट्टींनी वनताराच्या सीईओंसोबत हाल मिळवला नाही, यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, हे कॉर्पोरेट सेक्टरमधील लोक आहे. त्यांचा अॅटिट्युड बरोबर वाटला नाही.

इच्छाधारी नागाप्रमाणे भूमिका! लक्ष्मण हाकेंची शरद पवारांवर खोचक टीका

जनतेच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे ते दिलगीरीव्यक्त करायला आले होते, त्यामुळे मी त्यांना त्यांची जागा दाखवली. मी त्यांना म्हटलं की, आवाज कमी करून बोलायचं अन् माफी मागायची. असं म्हटल्यानंतर त्यांनी माफी मागितली.

पेटाकडे एवढा पैसा कुठून येतो?

यामध्ये पेटाची कार्यपद्धती संशयास्पद आहे. वेगवेगळे पाळीव हत्ती आहेत, त्यासंदर्भात तक्रारी करणं. कोर्टात याचिका दाखल करणं, मग कोर्ट विचारतं की याची देखभाल कोण करणार, मग पेटा वनताराचा पर्याय सुचवते.राज्यातील राखीव केंद्रांची शिफारस पेटाने केल्याचं कधीच मी ऐकलेलं नाही. हा योगायोग नाही, कारण वनताराच्या सल्लागार मंडळावर पेटाचे पदाधिकारी आहेत. पेटाच्या लोकांनी मठाला मोठी रक्कम देणगी म्हणून ऑफर केली.

उत्पन्नात ‘तूट’ नव्हे ‘तोटा’, एसटी महामंडळाचा खुलाशातही कांगावा; श्रीरंग बरगेंची घणाघाती टीका

पेटाने तिसगावच्या मंडळाच्या ट्रस्टीनीं आरोप केला की, त्यांना तीन कोटीची ऑफर केली होती. पेटाकडे एवढा पैसा कुठून येतो? असा सवाल देखील राजू शेट्टी यांनी उपस्थित केलाय.

हत्ती कागदावर आजारी पडला

खासदार राजू शेट्टी यांनी यासंदर्भात एक पत्र पेटाला लिहिल्याचं व्हायरल होतंय. नांदणी मठाची माधुरी हत्तीण 35 वर्षापासून आहे. नागप्पा नावाचा माहूत होता, त्याला हृदयविकाराचा धक्का आल्याने त्याला ते काम थांबावायला सांगितलं. माहुताशिवाय हत्ती सांभाळणं शक्य नव्हतं, त्यामुळे मी राज्याच्या वनखात्याला गडचिरोलीत हा हत्ती ठेवावा. या हेतूने पत्र लिहिलेलं होतं. हत्तीला काहीही झालेलं नाही, खोटे पुरावे तयार करण्यात आले. हत्ती कागदावर आजारी पडला होता, कारण त्याला नांदणी मठातून काढायचं होतं, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. सुप्रीम कोर्टाने एकतर्फी निर्णय दिला. कोर्टाची बाजू ऐकून न घेता निर्णय दिला आहे, असं देखील राजू शेट्टींनी म्हटलंय.

follow us