ब्रेकिंग : फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरणातील संशयित आरोपी गोपाळ बदने पोलीस खात्यातून बडतर्फ

Gopal Badne : फलटण येथील डॉक्टर युवतीच्या आत्महत्या प्रकरणात आरोपी निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले

Gopal Badne

Gopal Badne

Phaltan Doctor Suicide Case PSI Gopal Badne Suspended From Police Departmane : फलटण येथील डॉक्टर युवतीच्या आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपी निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले असल्याची माहिती सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयातून देण्यात आली आहे. साताऱ्यातील फलटण येथील डॉक्टर युवतीच्या आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपी गोपाळ बदने आणि इंजिनिअर प्रशांत बनकरला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्यांची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तर आता सातारा पोलीस अधीक्षकांनी मोठी कारवाई करत गोपाळ बदने याला पोलीस खात्यातून बडतर्फ केले आहे.

गोपाळ बदने (Gopal Badne) याने बेफिकिरीने, नैतिक अध:पतन व दुर्वर्तन, विकृतपणे पोलीस उपनिरीक्षक पदाचा व अधिकारांचा दुरुपयोग केल्याने तसेच समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणारी वर्तणुक केल्याने सुनिल फुलारी (Sunil Phulari) विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांनी भारतीय राज्यघटना 1950 मधील अनुच्धेद 311(2)  ब नूसार शासकिय सेवेतून  गोपाळ बदने याला पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आला असल्याची माहिती सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयातून देण्यात आली आहे.

प्रकरण काय?

फलटण येथील एका डॉक्टर महिलेने निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याने चारवेळा अत्याचार केला तर इंजिनिअर बनकर याने मानसिक छळ केला असे तळहातावर लिहून 23  ऑक्टोबर रोजी फलटण येथील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. यानंतर फलटण पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

कधी सीमा तर, कधी स्वीटी म्हणून ब्राझिलियन मॉडेलने मतदान केले’, राहुल गांधींनी ‘हायड्रोजन बॉम्ब’ फोडला

तर दुसरीकडे या प्रकरणाचा तपास करत असताना फलटण पोलिसांना दोघांच्या मोबाइलमधून महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास आयपीएस अधीकारी तेजस्वी सातपुते यांच्या देखरेखीखाली सुरु आहे.

Exit mobile version