Download App

राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मोदींकडून खास गिफ्ट; शिंदे गटाला मिळणार 2 मंत्रिपदं

PM Modi Cabinet Expansion :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 आमदार व 10 अपक्ष आमदारांसह भाजपसोबत सरकार स्थापन केले. गेल्या वर्षाभरात सत्तासंघर्षामुळे हे सरकार कायम चर्चेत राहिले. ( PM Modi Cabinet Expansion )  त्यानंतर शिवसेनेतील दोन नेत्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. ( Shivsena CM Eknath Shinde )

काल राज्यभर आषाढी एकादशीचा उत्साह होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कुटुंबासह विठ्ठलाची महापूजा केली. यानंतर अचानक शिंदे व फडणवीस रात्री दिल्लीला रवाना झाले. त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक झाल्याची माहिती असून या बैठकीत शिंदे गटाला दोन मंत्रिपदे देण्याची चर्चा झाल्याचे कळते आहे.

कोविड सेंटर घोटाळ्यावरुन देवेंद्र फडणवीसांकडून ठाकरेंचा ‘कफनचोर’ उल्लेख…

या बैठकीत शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एक राज्यमंत्री पद देण्यात येणार असल्याचे कळते आहे. तसेच या बैठीकत शिंदे गटाकडून कोण मंत्री होऊ शकतात?  कोणत्या मंत्र्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळेल? अशी चर्चा करण्यात येते आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौऱ्यावरुन परत आल्यानंतर बैठकांचा सपाटा लावला आहे. मोदींनी पुढील आठवड्यात मंत्रिपरिषदेची बैठक बोलावली आहे. यात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलाबाबत चर्चा होणार आहे. राज्याच्या सत्तासंघर्षात शिंदेंनी दाखवलेल्या निष्ठेचं फळ म्हणून दोन मंत्रीपदं शिवसेनेला दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

शिंदे-फडणवीस सरकारची वर्षपूर्ती! अभूतपूर्व राजकीय नाट्यानंतर ‘शिंदेशाही’ला झाली होती सुरुवात…

सध्या एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे 13 खासदार आहेत. यापैकी कुणाची मंत्रिपदावर वर्णी लागणार याची चर्चा आता सुरु झाली आहे. एकनाथ शिंदेंचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचाही केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज