शिंदे-फडणवीस सरकारची वर्षपूर्ती! अभूतपूर्व राजकीय नाट्यानंतर ‘शिंदेशाही’ला झाली होती सुरुवात…

शिंदे-फडणवीस सरकारची वर्षपूर्ती! अभूतपूर्व राजकीय नाट्यानंतर ‘शिंदेशाही’ला झाली होती सुरुवात…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालंय. मागील वर्षी 30 जूनलाच शिंदे-फडणवीसांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मागील वर्षी 20 ते 30 जून कालावधीत अनेक राजकीय नाट्याच्या घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, 29 जूनला उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याच्या दुसऱ्याचं दिवशी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

‘मैं तो चला, जिधर चले रस्ता, मुझे क्या पता, मेरी मंझिल है कहा’ अनाथ मुलीच्या प्रश्नावर गडकरींचा दिलखुलास संवाद

महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी शपथ घेतली. 20 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत शिवेसेनेत असताना बंड केलं. त्यानंतर राज्यातील प्रस्थापित सरकार कोसळलं. शिंदेंनी केलेल्या बंडामुळेच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं. या बंडानंतर शिवसेना पक्षासाठी ठाकरे-शिंदेंमध्ये संघर्ष सुरु झाला. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला होता.

राजकारणातील आदर्श कोण? गडकरींनी घेतलं ‘या’ कम्युनिष्ट नेत्याचे नाव

मागील वर्षी 20 जूनला विधान परिषदेच्या निवडणूक झाली. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरेंचा पराभव झाला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे आपल्या समर्थकांसह सुरतला रवाना झाले होते.
29 जून रोजी एकनाथ शिंदेसोबत गेलेले आमदार गुवाहाटीवरून गोव्याकडे गेले. त्यानंतर 30 जून रोजी समर्थक आमदारांना गोव्यातच ठेवून एकनाथ शिंदे प्रमुख आमदारांसह मुंबईकडे रवाना झाले. एकनाथ शिंदे संपर्कात नसल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.

https://www.youtube.com/watch?v=4kHPPxLzHfE

राज्यापालांनी दिलेल्या बहुमत चाचणीविरोधात ठाकरे गटाने न्यायालयात याचिक दाखल केली मात्र, याचिका फेटाळल्याने उद्धव ठाकरे यांनी 29 जून रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर 30 जून रोजी एकनाथ शिंदे आपल्या समर्थकांसह मुंबईत दाखल झाले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube