मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनीही नौदलाला नवी शक्ती आणि दृष्टी दिली होती. त्यांच्याच या पवित्र धरतीवर 21 व्या शतकातील नौदलाला अधिक सशक्त बनवण्यासाठी मोठे पाऊल उचलत आहोत असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केले. मुंबईतून INS सुरत, INS निलगिरी आणि INS वाघशीर या तीन युद्धनौका मोदींच्याहस्ते देशाला समर्पित करण्यात आल्या. त्यावेळी ते बोलत होते. नौदलाचा गौरवशाली इतिहास आहे. या तीन युद्धनौका भारतात बनवल्या गेल्या आहेत, ज्यामुळे सुरक्षेला नवे बळ मिळेल असा विश्वास यावेळी मोदींनी व्यक्त केला. (PM Narendra Modi commissions INS Surat, INS Nilgiri, INS Vaghsheer in Mumbai)
कराडने विचारलं रोहित कुठंय? आ. धसांनी थेट सगळचं सांगितलं
आत्मनिर्भर भारत अभियानासाठी मोठा दिवस
उपस्थितांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, आजचा दिवस भारताच्या सागरी वारशासाठी, नौदलाच्या गौरवशाली इतिहासासाठी आणि आत्मनिर्भर भारत अभियानासाठी एक मोठा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय नौदलाला नवीन शक्ती आणि नवीन दृष्टीकोन दिला. आज त्यांच्या पवित्र भूमीवर, आपण २१ व्या शतकातील नौदलाला बळकट करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत आहोत. एकाच वेळी नौदलात विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुडीचा समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
7 हजार रुपयांची चिल्लर नाणी अन् मोजण्यासाठी पाच तास; महावितरण कर्मचाऱ्यांचा निघाला घाम
कोरोना काळातही भारताने चांगलं काम केलंय. भारतानं ‘सागर’ हा जगाला मंत्र दिला. वाघशीर या सहाव्या पाणबुडीचं राष्ट्रार्पण करण्याचं भाग्य मिळालं. जगाचा भारतावरील विश्वास वाढलाय. आपण जगाला वन अर्थ, वन फॅमिलीचा मंत्र दिल्याचेही मोदी म्हणाले. भारतीय नौदल अधिक शक्तिशाली बनत असल्याचेही मोदी म्हणाले.
#WATCH मुंबई, महाराष्ट्र: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा, "आज भारत की समुद्री विरासत, नौसेना के गौरवशाली इतिहास और आत्मनिर्भर भारत अभियान के लिए भी बहुत बड़ा दिन है। छत्रपति शिवाजी महाराज ने भारतीय नौसेना को नया सामर्थ्य और विजन दिया था। आज उनकी पावन धरती पर 21वीं सदी की नौसेना… pic.twitter.com/b9K0vX4uiW
— ANI_HindiNews (@AHindinews) January 15, 2025
आयएनएस सूरत, आयएनएस नीलगिरी आणि आयएनएस वाघशीर या युद्धनौका भारतीय निर्मित असून, ही करोडो भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आजचा भारत जगातील एक प्रमुख सागरी शक्ती म्हणून उदयास येत आहे. आज भारताला जागतिक स्तरावर विशेषतः ग्लोबल साऊथमध्ये एक विश्वासार्ह आणि जबाबदार भागीदार म्हणून ओळखला जात आहे. भारत विस्तारवादाने नव्हे तर, विकासाच्या भावनेने काम करत असल्याचे सांगत भारताने नेहमीच खुल्या, सुरक्षित, समावेशक आणि समृद्ध इंडो-पॅसिफिक प्रदेशाचे समर्थन केले आहे असे मोदींनी यावेळी सांगितले.
राज्यातील शाळांत CBSE पॅटर्न; शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी काय सांगितलं?
जल, जमीन आणि आकाश यांचे रक्षण करण्याचे ध्येय
सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाची सुरुवात अनेक मोठे निर्णय घेऊन झाल्याचा उल्लेख करत देशाच्या गरजा लक्षात घेऊन आम्ही नवीन कामे सुरू केली आहेत, देशाच्या कानाकोपऱ्याचा विकास होण्यासाठी आम्ही एकत्र पुढे जात असल्याचेही मोदी म्हणाले. 21व्या शतकातील भारताची लष्करी क्षमताही अधिक सक्षम आणि आधुनिक असायला हवी, ही देशाची प्राथमिकता आहे. पाणी असो, जमीन असो, आकाश असो, खोल समुद्र असो या सर्वांचे रक्षण करण्याचे आपले ध्येय असल्याचे मोदी म्हणाले. यासाठी सातत्याने सुधारणा केल्या जात असल्याचे मोदींनी ननुद केले.