Download App

Waves 2025 Summit : सरकार वेव्हज पुरस्कार सुरू करणार, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

PM Modi Innagurate Mumbai Waves 2025 Summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज मुंबईत जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेचे (वेव्हज) उद्घाटन केलंय. पंतप्रधान मोदी म्हणाले की सरकार, कलेसाठी वेव्हज पुरस्कार (Waves 2025) सुरू करणार आहे. येत्या काही वर्षांत प्रत्येकाच्या प्रयत्नांमुळे नवीन उंची गाठण्यास मदत होईल. आम्ही वेव्हज पुरस्कार देखील सुरू करणार (PM Modi In Mumbai) आहोत.

हा कलांमधील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार असेल, असं देखील पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलंय. पहिल्याच व्हेवज परिषदने जगाचे लक्ष वेधले. भारतीय सांगित लवकरच जगाची ओळख बनेल. सर्जनशिलतेला कोणतीही सीमा नाही, भारतात ऑरेंज इकॉनॉमिची सुरवात होत आहे. असं देखील पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय.

कर्जत नगरपंचायत सत्ताकारण, जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल उच्च न्यायालयाने फेटाळला; नव्याने निर्णय घेण्याचे दिले आदेश

पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, वेव्हज 2025 ही भारतातील (Mumbai Waves 2025 Summit) अशा प्रकारची पहिलीच शिखर परिषद आहे. ‘कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज’ अशा घोषवाक्य असलेल्या वेव्हज 2025 मध्ये 90 हून अधिक देशांचे लोक सहभागी होतील, ज्यामध्ये 10,000 हून अधिक प्रतिनिधी, 1000 निर्माते, 300 हून अधिक कंपन्या आणि 350 हून अधिक स्टार्टअप्स सहभागी झाले आहेत.

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी म्हटलंय की, 10 हून अधिक देशांमधील कलाकार, निर्माते, गुंतवणूकदार आणि धोरणकर्ते एकाच छताखाली एकत्र आले आहेत. जागतिक सर्जनशीलतेची जागतिक प्रतिभा एकत्र आली आहे. त्याचा पाया रचला जात आहे. WAVES हे केवळ एक संक्षिप्त रूप नाही. ते खरोखर संस्कृती, सर्जनशीलता आणि वैश्विक संबंधाची लाट आहे.चित्रपट, संगीत, गेमिंग, अ‍ॅनिमेशन, कथाकथन हे या लाटेचा एक भाग आहेत. WAVES हे एक जागतिक व्यासपीठ आहे. जे प्रत्येक कलाकारासाठी एक व्यासपीठ आहे, जिथे प्रत्येक तरुण सर्जनशील जगाशी जोडला जाईल.

महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांनी हुतात्म्यांना वाहिली श्रद्धांजली, अर्थव्यवस्था सुधारण्याची घेतली शपथ

112 वर्षांपूर्वी 3 मे 1913 रोजी पहिला चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ प्रदर्शित झाला होता. दादासाहेब फाळके हे त्याचे निर्माते होते. काल त्यांची जयंती होती. गेल्या 100 वर्षांत भारतीय चित्रपट जगभर पसरला आहे. ए.आर. रहमान, राजामौली, ऋत्विक घटक, प्रत्येकाने भारतीय चित्रपटासाठी जगात एक स्थान निर्माण केले आहे.

 

follow us