महाराष्ट्राला पैसे कमी पडणार नाही, मात्र पुण्याला झुकते माप ; अजित पवारांचं मोठं विधान

महाराष्ट्राला पैसे कमी पडणार नाही, मात्र पुण्याला झुकते माप ; अजित पवारांचं मोठं विधान

Ajit Pawar Tribute At Maharashtra Foundation Day : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, 65 वर्षांपूर्वी महाराष्ट्र संयुक्त (Maharashtra Politics) झाला. आज 66 व्या स्थापना दिनानिमित्त नागरिकांना शुभेच्छा! कष्टकऱ्यांच्या घामाच्या जीवावर राज्य उभे आहे. कामगार दिनाच्या शुभेच्छा!

सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचे उद्घाटन (Ajit Pawar Tribute At Maharashtra Foundation Day) झालं, ज्यांनी ज्यांनी या पुलाचा पाठपुरावा केला त्याचे सुद्धा अभिनंदन. पुरंदर विमानतळासाठी काही लोकं आंदोलनाला बसतात, पण कोणाची ना कोणाची जमीन घेऊन पुनर्वसन केल्याशिवाय होत नाही. बाणेर येथे असलेल्या 350 कोटीच्या प्रकल्पाचे आज वेळ नसल्यामुळे उद्घाटन करता येत नाही, असं देखील अजित पवार यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राला जागं करण्यासाठी येताहेत…पुन्हा शिवाजीराजे भोसले! सिद्धार्थ बोडके साकारणार मुख्य भूमिका

मुलांनी पुढील काळात कसे शिक्षण मिळेल, यासाठी आम्ही अनेक जिल्ह्यात काम करतोय. कुठलीही अडचण नाही, लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. जम्मू काश्मीरबद्दल ची घटना म्हणजे विकृती आहे. ती विकृती कशी मोडता येईल, याचे काम मोदींच्या नेतृवाखाली सुरू आहे. सिंहगड रोड पुलामुळे नागरिकांचा अर्ध्या तास कमी होईल, असं देखील अजित पवार यांनी म्हटलं आहे.

देशावर मोठं संकट, भारत पाकिस्तान युद्ध होणार? भेंडवळच्या घटमांडणीत मोठं भाकीत

शहरात 2 रिंग रोड करत आहोत, पुणे महापालका, पिंपरी चिंचवड महापालिका, पी एम आर डी ए, राज्य सरकार आम्ही ही कामं पूर्णत्वाला नेण्याचे काम करतोय. आम्ही सगळेजण मिळून 5 वर्षात शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. यंदाचा अर्थसंकल्प 7 लाख कोटींचा सदर झाला. महाराष्ट्राला पैसे कमी पडणार नाही, मात्र पुणे आपलं आहे. त्याला झुकते माप दिले जाईल. सकाळी उद्घाटन केलं तर इतरांना काम त्रास होतो, उशिरा उठणाऱ्या लोकांना सुद्धा लवकर उठावे लागतं, असं देखील मिश्कीलपणे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube