देशावर मोठं संकट, भारत पाकिस्तान युद्ध होणार? भेंडवळच्या घटमांडणीत मोठं भाकीत

Bhendaval Prediction On India Pakistan War : सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये (India Pakistan War) मोठं तणावाचं वातावरण आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांत पून्हा संघर्षाचा वणवा भडकला आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान युद्ध होणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. याच संदर्भात भेंडवळच्या घट मांडणीत मोठं भाकीत करण्यात (Bhendaval Prediction) आलंय. हे भाकीत सारंगधर महाराज वाघ यांनी (Akshay Truiya Muhurt) वर्तवलं आहे.
भारत पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण (India Pakistan) स्थिती राहणार असल्याचं भेंडवळच्या घटमांडणीत वर्तविण्यात आलंय. अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर ही घटमांडणी करण्यात येते. बुलढाण्यात अक्षय तृतीयेला घटमांडणी केली जाते. यंदा याच घटमांडणीतून देशावर मोठं संकट, राजकीय तणाव अन् युद्धजन्य परिस्थितीचा इशारा देण्यात आलाय. यासोबतच राज्यामध्ये पावसाची अन् शेतीची स्थिती देखील अनिश्चित राहील, असं सांगितलं गेलंय.
सुरज चव्हाण आणखी अडचणीत, झापूक झुपूक डॉयलॉग चोरल्याचा इन्फ्लुएंन्सरचा दावा
साडेतीनशे वर्षांपूर्वीची परंपरा कायम राखत भेंडवळ येथे मोठी भविष्यवाणी करण्यात आली आहे. देशावर वर्षभर युद्धाचं सावट राहील, परंतु युद्ध होणार नाही. राजा म्हणजेच देशाचे पंतप्रधान तणावात राहतील. पृथ्वीचा काही भाग नष्ट होईल. सोबतच पाणी अन् पावसाची अनिश्चितता राहील, असं भाकीत करण्यात आलंय. पृथ्वीचा काही भाग नष्ट होण्याची भीती देखील या भाकितामधून व्यक्त करण्यात आल्याची माहिती मिळतेय.
भाकितामध्ये सांगण्यात आलंय की, मान्सूनच्या पहिल्या महिन्यात पावसाचं प्रमाण कमी असेल तर दुसऱ्या महिन्यामध्ये चांगला पाऊस होईल. तिसऱ्या महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी असेल, तर चौथ्या महिन्यामध्ये अवकाळी पावसाचा फटका बसेल. यावर्षी कपाशी आणि तुरीचं पीक अनिश्चित असेल. तर मूग आणि उडिदाचं पीक सर्वसाधारण येईल, असं म्हटलंय.
बदनाम करण्यासाठी विरोधकांचा हा केविलवाणा प्रयत्न…कर्ज घोटाळा प्रकरणावरून विखेंचा विरोधकांवर पलटवार
पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवळ या गावात 370 वर्षापासून प्राचीन अशी भेंडवळची परांपरा आहे. ऐतिहासिक आणि मोठं संस्कृतिक महत्व असलेल्या भेंडवळची अक्षय्य तृतीय्येला घटमांडणी होते अन् दुसऱ्या दिवशी भाकीत वर्तवले जाते. आज सकाळी सूर्योदय होण्याआधी भेंडवळचे भाकीत वर्तवण्यात आले. भेंडवळ येथील भाकितानुसार, यंदा पावसाची स्थिती सर्वसाधारण राहील, परंतु त्यात अनिश्चितता जास्त असेल. महाराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिकांच्या वाढीसाठी आवश्यक पाऊस हा देखील सर्वसाधारण पातळीवर राहील, परंतु त्यात अनिश्चितता जास्त असेल. याचा अर्थ, काही ठिकाणी पिकांना योग्य पाणी मिळेल, तर काही भागात पावसाच्या अनियमिततेमुळे पिकांवर परिणाम होऊ शकतो. शेती उत्पादनात स्थिरता राहील, परंतु अपेक्षित वाढ होण्याची शक्यता कमी आहे.