Download App

अण्णाही अनेक वर्ष ‘आप’दे मध्ये अडकले; आपला फटकारताना मोदींकडून आण्णा हजारेंचाही उल्लेख

पंतप्रधान मोदींनी केजरीवाल यांच्यावर टीका करताना आण्णा हजारेंचाही उल्लेख केला. केजरीवाल यांच्यावर टीका करताना आण्णा हजारेंचाही उल्लेख केला.

PM Modi on AAP and Anna Hajare after Delhi Elections Victory : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारत दिल्लीची सत्ता आम आदमी पक्षाच्या हातातून अक्षरशः हिसकावून घेतली आहे. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीतील जनतेचे आभार मानले. तसेच यावेळी त्यांनी केजरीवाल यांच्यावर टीका करताना आण्णा हजारेंचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, आण्णा हजारे देखील अनेक वर्षांपासून या ‘आप’दा मध्ये अडकले होते.

दिल्लीत काँग्रेसची झिरोची डबल हॅट्रिक, स्वत: सह मित्रपक्षांना बुडवलं; मोदींनी कॉंग्रेसलाही सुनावलं

यावेळी मोदी म्हणाले की, मी आज वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते आण्णा हजारे यांची पत्रकार परिषद ऐकली. त्यांनी देखील अनेक वर्षांपासून आपचा त्रास सहन केला. आज त्यांना देखील या त्रासापासून मुक्ती मिळाली. मात्र केजरीवाल्यांचा आम आदमी पार्टी हा पक्ष भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून भ्रष्टाचार मुक्त देश बनवण्यासाठी उभा राहिला. पण शेवटी ते देखील भ्रष्टाचाराच्या विळख्यातच सापडले. त्यामुळे ते देशासाठी कट्टर बेईमान निघाले आहेत. असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी आण्णा हजारे यांचा उल्लेख करत केजरीवालांसह आप पक्षाचे कान टोचले.

सत्ता म्हणजे अहंकार नाही, तर लोकांच्या समस्या सोडविण्याचा मार्ग; सुमित्रा महाजन

कॉंग्रेसवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, जनतेने पुन्हा एकदा काँग्रेसला देखील कडक संदेश दिला आहे.दिल्लीतील निवडणुकांमध्ये काँग्रेसने झिरोची डबल हॅट्रिक केली आहे. देशाच्या राजधानी मध्ये देशातील सर्वात जुन्या पक्षाचा सातत्याने सहाव्यांदा खातही उघडलेलं नाही. आणि ते स्वतःला पराजयाचा गोल्ड मेडल देत आहे मात्र सत्य हे आहे की काँग्रेसवर देश अजिबात विश्वास ठेवायला तयार नाही. मागच्या वेळी म्हटल्याप्रमाणे काँग्रेस एक परजीवी पक्ष बनला आहे जे स्वतःही बुडत आहे आणि जे सोबत येतील त्यांनाही बुडवत आहे. त्यामुळे काँग्रेसचे एकामागे एक मित्रपक्ष नष्ट होत आहे. तसेच ते आपल्या मित्र पक्षाच्या वोट बँकेवर डोळा ठेवतात. असं म्हणत त्यांनी कॉंग्रेसला सुनावलं आहे.

follow us