Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. दुसऱ्यांदा उपोषण मागे घेताना मनोज जरांगे पाटलांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. या पार्श्वभूमीव मनोज जरांगे पाटलांच्या राज्यभर जाहीर सभा सुरु आहेत. सर्वत्र यशस्वीरित्या सभा पार पडत असतानाच धाराशिवमध्ये जरांगे पाटलांच्या सभेवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. रात्री उशिरापर्यंत सभा आयोजित केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटलांची सभा आयोजित करणाऱ्या आयोजकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अखेर प्रतीक्षा संपली! रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ चित्रपटाचा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार रिलीज
धाराशिवमध्ये 19 नोव्हेंबर रोजी रात्री 22.00 ते 23.05 पर्यंत जमावबंदीचे आदेश लागू केले होते. पण याचा कालावधीमध्ये धाराशिवमधील वा. सु. हायस्कुल कन्या प्राथमिक शाहा ईट येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय. दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ सभा चालू ठेवून आदेशाचे उल्लघंन करण्यात आल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आलीये.
इतिहासाचा दाखला, मंत्र्यांवर निशाणा; पुण्याच्या खराडीत जरांगेंनी पुन्हा फुंकलं रणशिंग
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्यासह मराठा समाजबांधवांकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा समाजाला कुणबीचे दाखले देऊन ओबीसी आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी राज्यभरातील मराठा समाजाकडून केली जात आहे. मनोज जरांगे यांनी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला. त्यानंतर राज्यभरातील मराठा समाजबांधवांकडून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला.
मनोज जरांगे यांचं उपोषण सुरु असताना राज्यातील विविध जिल्ह्यांत मराठा समाजाकडून समर्थन दिलं जात होतं. याचदरम्यान, बीडमध्ये या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं. बीडमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांचं घर मराठा आंदोलकांनी पेटवून दिल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरासह कार्यालयही पेटवून देण्यात आल्याचं पाहायला मिळालं. एकूणच परिस्थिती हाताबाहेर जात असताना राज्य सरकारने मनोज जरांगेंच्या आंदोलनाची दखल घेत उपोषण मागे घेण्याबाबत विनवणी केली.
सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर मनोज जरांगे पाटलांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. तर दुसरीकडे मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासाठी राज्य सरकारकडून माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती गठीत करण्यात आलीयं. समितीच्या माध्यमातून निजामकालीन कुणबी पुरावे शोधण्याचं काम सुरु असून आत्तापर्यंत शिंदे समितीला लाखोंनी पुरावे आढळून असल्याचं समजतयं.
मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडल्यानंतर राज्यभर दौरा करण्याचं जाहीर केलं. त्यानूसार काल मनोज जरांगे यांची सभा रायगडसह पुण्यात झाली. त्यानंतर धाराशिवमध्येही जरांगे पाटलांची सभा आयोजित करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत ही सभा आयोजित करण्यात आल्याने पोलिसांनी आयोजकांवर कारवाई केली आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे यांच्या पुढील सभा नियोजित वेळेतच घ्यावा लागणार असल्याचं दिसतंय.