Devendra Fadnavis : ड्रग तस्करी प्रकरणात पोलीस सहभागी असेल तर त्या पोलीसाला बडतर्फ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस आज विधान परिषदेमध्ये बोलत होते.
काॅंग्रेस (Congress) नेते भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी ड्रग प्रकरणात विधान परिषदेमध्ये आज लक्षवेधी मांडली होती. या लक्षवेधीवर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा करत अमली पदार्थांच्या व्यवहारात पोलिसांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आढळल्यास त्यांना कलम 311 अंतर्गत बडतर्फ करण्यात येणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Any police personnel found directly or indirectly involved in drug-related activities will face immediate dismissal under Section 311.
अमली पदार्थांच्या व्यवहारात पोलिसांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आढळल्यास कलम 311 अंतर्गत बडतर्फ करणार.
(विधान परिषद, मुंबई | दि. 3 जुलै… pic.twitter.com/cX6r01HBun
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 3, 2025
विधान परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या दोन – तीन वर्षात केंद्र आणि राज्य सरकारने अमली पदार्थांविरोधात मोठा लढा उभा केला आहे. अमली पदार्थाविरोधात लढा देण्यासाठी सुरुवातीला पोलीस स्टेशन लेव्हलवर पदांची निर्मिती करण्यात आली होती तर आता पदे देखील भरण्यात आली आहे. आज अमली पदार्थाविरोधात एक युनिट निर्माण करण्यात आली आहे. या युनिटला संपूर्ण प्रक्षिपण देण्यात येत आहे. युनिटला अमली पदार्थ सापडला तर त्याची पुढची कारवाई कुठे करायची याबाबत संपूर्ण व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये बोलताना दिली.
महाराष्ट्रात 90 दिवस अन् 767 शेतकऱ्यांची आत्महत्या पण सरकार गप्प; राहुल गांधींचा हल्लाबोल
पुढे बोलताना अमली पदार्थांच्या काही प्रकरणात पोलिसांचा सहभाग दिसून आला आहे. त्यामुळे अमली पदार्थ प्रकरणात पोलिसांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आढळल्यास आपण पोलिसांना सस्पेंड करत नाही तर थेट बडर्तेफ करत असल्याची माहिती देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. कलम 311 अंतर्गत पोलिसांवर कारवाई करण्यात येत आहे. असं देखील मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.