Download App

मंत्री जयकुमार गोरे प्रकरणी…प्रभाकर देशमुख, सुप्रिया सुळे, रामराजे निंबाळकर, रोहित पवारांचे नाव घ्या; पोलिसांचा पत्रकार तुषार खरातांवर दबाव

Police Pressure On Tushar Kharat Jayakumar Gore Case : मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात चुकीच्या बातम्या दाखवल्या प्रकरणी पत्रकार तुषार खरात (Tushar Kharat) कारागृहात आहेत. या प्रकरणात प्रभाकर देशमुख, सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar), रोहित पवार (Rohit Pawar) यांचे नाव घ्या, असा पोलीस खरात यांच्यावर दबाव टाकत असल्याचं समोर आलंय.

सातारा जिल्ह्यातील स्वत:चं युट्युब चॅनल असलेले तुषार खरात यांना काही दिवसांपू्र्वी अटक करण्यात आली होती. वेगवेगळ्या तीन प्रकरणांमध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. खरात लई भारी नावाचं युट्युब चॅनल चालवत होते. याच न्यूज चॅनलवरून ते ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jayakumar Gore Case) यांच्याविरोधात सातत्याने न्यूज बनवत होते. याचप्रकरणी ते आज 10 मार्चपासून कारागृहात आहेत.

NSA अजित डोभाल यांचं फेसबूक अकाउंट नाहीच; सोशल मीडियावरील अकाउंट फेक, PIB चा खुलासा

खरात यांच्यावर ज्या तीन केसेस झालेल्या आहेत, त्यापैकी सातारा येथील झालेल्या केसमध्ये अॅडव्होकेट राजेंद्र गलांडे हे खरात यांचे वकील आहेत. या तिन्ही केस एकमेकांशी संबंधित असल्याचं गलांडे यांनी म्हटलंय. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचं पू्र्वीचं वर्तन तुषार खरात यांनी सारखं सारखं समोर आणलं. विधिमंडळाच्या अधिवेशनात त्यांना प्रश्न विचारले. परंतु त्या प्रश्नांना थेट उत्तर मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलं नाही. त्यामुळेच सुड म्हणून हे दोन-तीन गुन्हे त्यांच्याविरोधात दाखल झालेले दिसतात.

याप्रकरणाचा तपास पूर्णपणे मंत्रीमहोदयांच्या दबावाखाली सुरू आहे, असं दिसून येतंय. तक्रारीत मंत्री महोदयांनी देखील एक पत्र दिलेलं आहे. हे सगळं पाहता याच्यामध्ये जाणीवपूर्वक जास्तीत जास्त काळ जामीन अर्जाला उशीर करणं, या देखील युक्त्या सरकारच्या वतीने वापरण्यात येत आहेत. याच्यामध्ये स्पेशल प्रॉसेक्युटरची नेमणूक झालेली होती. सातारच्या गुन्ह्यात पहिली आरोपी महिला आहे. दुसरे आरोपी अनिल सुभेदार हे राजकीय व्यक्ती आहेत, जे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी होते. तर आरोपी नंबर तीन तुषार खरात आहेत.

‘अंतर्गत सुरक्षेसाठी बैठक बोलवली…आम्ही अलर्टवर’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या तिघांनाही सरकारच्या वतीने सेशन कोर्टामध्ये कमी पोलीस कोठडी मिळाली. आम्हाला या तिघांचीही तपासणी करा, रिव्हीजन करायची आहे अशी मागणी त्यांनी केली. त्यामध्ये रिव्हीजन कोर्टाने दोन दिवसांची पीसी अजून वाढवली. परंतु त्यावेळी सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींना वॉरंट देऊन बोलून घेतलं होतं. त्यावेळी तिन्ही आरोपींनी आमच्यावर पोलीस काही तपास करीत नाही.

या प्रकरणात प्रभाकर देशमुख, सुप्रिया सुळे आणि रामराजे नाईक निंबाळकर, रोहित पवार यांचे नाव तपासादरम्यान घ्या. यांच्या सांगण्यामुळे आम्ही असंकाही करत आहोत, असा दबाव पोलीस टाकत असल्याचं तिन्ही आरोपींनी म्हटलंय. लेखी स्वरूपात देखील दिली आहे. पत्रकार तुषार खरात यांनी मेहेरबान कोर्टात तपासअधिकारी सोनवणे यांनी मारहाण केल्याची आणि प्रभाकर घार्गे यांचंसुद्धा नाव घेण्यासाठी दबाव आणल्याची तक्रार केली आहे, अशी माहिती राजेंद्र गलांडे यांनी दिली आहे.

 

follow us