Download App

Pooja Khedkar : केंद्र सरकारची मोठी कारवाई, पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ

Pooja Khedkar : पूजा खेडकर यांच्यावर केंद्र सरकारकडून मोठी कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, केंद्र सरकारने

  • Written By: Last Updated:

Central government discharges Puja Khedkar from Indian Administrative Service with immediate effect : पूजा खेडकर यांच्यावर केंद्र सरकारकडून (Central Government) मोठी कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, केंद्र सरकारने पूजा खेडकर यांना आयएएस सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी UPSC ने 31 जुलै 2022 च्या सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेसाठी अर्जात चुकीची माहिती दिल्याचे कारण देत पूजा खेडकर (Puja Khedkar) यांची उमेदवारी रद्द केली होती. तर सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेसाठी पूजा खेडकर यांनी चुकीच्या पद्धतीने ओबीसी आणि अपंग कोट्याचा लाभ घेऊन फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. तर आता पूजा खेडकर यांना केंद्र सरकारने आयएएस सेवेतून बडतर्फ केल्याने पूजा खेडकर यांना मोठा धक्का मानला जात आहे.

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर कार्यालयात राजेशाही वागण्यापासून ते बोगस अपंगत्व प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र जोडल्याचे विविध आरोप त्यांच्यावर आहेत. या प्रकरणी पंतप्रधान कार्यालय, कार्मिक मंत्रालय, केंद्रीय लोकसेवा आयोग, मसुरी येथील लाल बहाद्दूर शास्त्री अकादमी अशा सर्वांनी अहवाल मागविला होता. यापूर्वी राज्य शासनाने सादर केलेल्या सविस्तर अहवालाच्या आधारे लाल बहाद्दूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीने त्यांना परत बोलावून घेतले होते आणि त्यानंतर राज्य शासनानेही त्यांना तातडीने कार्यमुक्त केले होते.

पुण्यात प्रशिक्षणार्थी म्हणून रुजु झालेल्या पूजा खेडकर यांना युपीएससी परिक्षेत 821 वी रँक मिळाली होती. त्यानंतरही त्यांना आयएएस केडर मिळाले. यासाठी त्यांनी बोगस अपंगत्व प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप केला जात आहे.

गोदावरी एक्स्प्रेसमध्ये यंदा दिसणार नाही बाप्पा, रेल्वेचा मोठा निर्णय, 28 वर्षांची परंपरा खंडीत

अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातून खेडकर यांनी दृष्टीहीन असून दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र मिळवले होते. यासोबतच त्यांची निवड ओबीसी प्रवर्गातून झाली होती. यासाठी वडिलांचं उत्पन्न 40 लाखांपेक्षा अधिक असूनही नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

follow us