डिझेल दरवाढीमुळं एसटीच्या तिकीटाचे दर वाढणार?, मंत्री प्रताप सरनाई काय म्हणाले?

इंधनवाढ झाली तर आम्हाला दरवाढ करावी लागेल. ज्या घटकांना सवलती दिल्या आहेत त्या लागू राहतील, असंही सरनाईक यांनी म्हटलं आहे.

News Photo   2026 05 18T143950.601

डिझेल दरवाढीमुळं एसटीच्या तिकीटाचे दर वाढणार?, मंत्री प्रताप सरनाई काय म्हणाले?

जगभरात सुरू असलेल्या युध्दाच्या (War) आणि भू-राजकीय वादाचा फटका अनेक देशाना बसताना दिसत आहे. आधी दूध, मग सीएनजी, सोने-चांदी, त्यानंतर आता पेट्रोल-डिझेलच्या दरातही मोठी दरवाढ झाली आहे. अशातच शिवसेना नेता आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठं संकेत दिले आहेत. यासंबंधीचा निर्णय लवकरच घेतला जाईल अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.

माध्यमांशी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, एसटीला १० लाख ८७ हजार लिटर डिझेल लागतं. इंडियन ऑईलकडून डिझेल पुरवठा होतं आहे. मागील आठवड्यात ३ रुपये दर वाढवला आहे. दरवाढीमुळे ३३ लाख ७० हजार आम्हाला जास्त मोजावे लागत आहेत. यामुळे महामंडळाचा वर्षाला १२४ कोटींचा तोटा होतो आहे. जागतिक पातळीवर युद्धाचा भडका उडाल्यास आणखी परिणाम होईल. पंतप्रधान यांनीही आवाहन केलं आहे. ⁠भविष्यात काय होईल हे आता सांगता येत नाही. विशेष सवलत देण्याचा निर्णय झाल्यास आम्ही दरवाढ करणार नाही.

एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना होणार रद्द; मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा

उद्या कॅबिनेट बैठक आहे, मुख्यमंत्री असतील तेव्हा त्यांना पत्र देणार आहेत. मे पर्यंत आम्ही थांबणार आहोत. पुढील १० ते १२ दिवस केंद्र आणि राज्य सरकारनं पुर्तता केली तर दरवाढ करणार नाही, मात्र पुर्तता न झाल्यास दरवाढ करावी लागेल, ऑईल कंपनीने पूर्व किंमतीत दिलं तर दरवाढ करणार नाही. इंधनवाढ झाली तर आम्हाला दरवाढ करावी लागेल. ज्या घटकांना सवलती दिल्या आहेत त्या लागू राहतील, असंही सरनाईक यांनी म्हटलं आहे.

पुढे सरनाईक म्हणाले की, बाईट टॅक्सीबाबत मी सायबर पोलिसांना पत्र देऊन अनधिकृत रित्या चालू आहेत. काही अनधिकृत रित्या पेट्रोल बाईक सुरू होत्या. काही ठिकाणी महिलांबरोबर गैरप्रकार घडले होते. अनेक नियम पायदळी तुडवल्या जात होत्या. कंपन्यांनी नियम पायदळी तुडवले त्यामुळे ही भूमिका घेतली. १५ तारखेला गुगलला पत्र दिलं त्यानंतर त्यांनी ओला उबेरच्या सरसकट गाड्यांवर बंदी घातली. त्यामुळे तो घोळ झाला, त्यात फक्त अनधिकृत बाईक टॅक्सीवर कारवाई केली जाईल, असंही पुढे सरनाईकांनी म्हटलं आहे.

Exit mobile version