Download App

महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत; शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी काय करावं? पवारांनी सांगितली पंचसुत्री

कोल्हापूर : जून आणि ऑगस्ट असे दोन महिने पावसाने दडी मारल्याने यंदा महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. या आगामी संकटाची चाहूल ओळखून राज्यकर्त्यांनी आतापासूनच शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी कार्यक्रम हाती घेतला पाहिजे असे आवाहन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. याशिवाय आपल्या यापूर्वीच्या राजकीय अनुभवातून त्यांनी या कार्यक्रमासाठी पंचसुत्रीही सांगितली आहे. (possibility of drought in Maharashtra and Sharad Pawar gave guidance as to what the ruling party should do in such a situation

काय म्हणाले शरद पवार?

आजच्याच वृत्तपत्रामध्ये एकंदर महाराष्ट्रातील जलसाठा कसा कमी झाला याची आकडेवारी दिली आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आणखी काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे. एकतर पेरण्या झाल्या आहेत, काही ठिकाणी दुबार पेरण्यांची गरज आहे, तर काही ठिकाणी पेरण्या झाल्या आणि पीक जळून गेलं. आता संकटाची चाहूल दिसत आहे. त्यावेळी काही गोष्टींची तरतूद करावी लागती.

Sharad Pawar : राष्ट्रवादीत फूट का पडलेली नाही? शरद पवारांनी सांगितलं शास्त्रीय कारण

यात राज्यकर्त्याकडून एक तर लोकांना जगण्याची स्थिती निर्माण केली गेली पाहिजे. त्यांच्या हाताला काम दिलं गेलं पाहिजे. त्यामुळे त्यासंबंधीची काम काढणं गरजेचं आहे. दुसरं पशूधन हा एक महत्वाचा भाग आहे. पशूधन वाचावायचं कसं याचा विचार होणं गरजेचं आहे. त्यासाठी एक तर त्यांना चारा पुरवा किंवा ठिकठिकाणी त्यांची व्यवस्था करणे, गायी, म्हशींची जी गरज आहे ती पुरणं गरजेचं आहे.

तिसरी गोष्ट म्हणजे पिण्याचं पाणी. आता मी सातारा जिल्ह्यातील माण, खटाव या भागात गेलो. तिथल्या अनेक लोकांनी सांगितलं की आता आम्हाला टँकरचे पाणी पितो. टँकरची संख्या वाढवा. सोलापूरसारख्या जिल्ह्यात चार दिवसांतून पाणी येतं. काही ठिकाणी सहा दिवसांतून पाणी येतं. तर पिण्याच्या पाण्याचा बंदोबस्त केला गेला पाहिजे.

राज्यकर्त्यांकडून शेतकरी आणि कष्टकऱ्यांकडून जी रक्कम वसूल केली जाते, टॅक्सच्या स्वरुपात पैसे गोळा केले जातात, त्या सगळ्यांना माफी दिली पाहिजे. जे कर्जदार आहेत, त्यांनाही सूट दिली पाहिजे, हप्ते दिर्घ केले पाहिजेत. दुष्काळाची चाहूल लागत असल्यामुळे हे सगळे कार्यक्रम आतापासूनच सुरु करणे गरजेचे आहे. असेही पवार म्हणाले. यासोबत यासाठी पक्षीय मतभेद विसरुन एकत्र काम करण्याचे आवाहनही त्यांनी राज्यकर्त्यांना केले.

‘बच्चू कडू कोण बाबा?’ गल्लीबोळातल्या लोकांवर..; कडूंच्या ‘त्या’ वक्तव्यावर पवारांचा खोचक टोला

पाचवा मुद्दा सांगताना शरद पवार म्हणाले, संकट दोन प्रकारची असतात. एक तर दुष्काळ किंवा दुसरी अतिवृष्टी आणि त्यातून झालेलं नुकसान. यात दोन यंत्रणा काम करत असतात. एक राज्य सरकार आणि दुसरे केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालतायतील एक विभाग. या सरकारने हा विभाग अलिकडील काळात बंद केला. मात्र हा विभाग पुनरुज्जीवत करुन त्यातून राज्य सरकारकडून पंचनामे करुन त्याचा अहवाल मागवून घेत शेतकऱ्यांना मदत केली गेली पाहिजे.

Tags

follow us