Download App

निलेश राणेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणं तरुणाला पडलं महागात!

पुणे : माजी खासदार निलेश राणे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडंलंय. निलेश राणे यांच्याविरोधात सोशल मीडियावर अश्लिल पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुभाष देसाईंनी मुख्यमंत्री शिंदेंची अक्कलच काढली

दि. 11 फेब्रुवारीला राहुल मगर नामक व्यक्तीने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन माजी खासदार निलेश राणे यांच्या ट्विटर हॅण्डलवर अश्लील रिट्विट केले होते.

याबाबत योगेश शिंगटे यांनी पुणे सायबर पोलिस विभागात राहुल मगर विरोधात तक्रार दाखल केल आहे. तसेच ठाण्यातील एका महिला कर्मचारीविरोधात देखील या राहुल मगर नावाच्या व्यक्तीने ६ मार्च रोजी ट्विटरवर अश्लील आणि आक्षेपार्ह भाषेत ट्विट केले होते.

छत्रपती संभाजी महाराज कडवे धर्मवीर.., आमदार शहाजीबापू पाटील यांचं वक्तव्य

या प्रकरणी पुण्यातील सायबर पोलिस विभागात तक्रार दाखल झाल्यानंतर, आता या प्रकरणी राहुल मगर या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राणे पिता-पुत्र आणि उद्धव ठाकरे यांच्यात आरोप-प्रत्यारोपाची फेरी सुरु असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता या तरुणाकडून आक्षेपार्ह पोस्ट केल्याने विरोधकांकडून सोशल मीडियावर राणे कुटुंबियांना टार्गेट केलं जातंय का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या प्रकरणी पोलिसांकडून तपास करण्यात आला अद्याप राहुल मगर याच्यावर पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली नाही.

Tags

follow us