सुभाष देसाईंनी मुख्यमंत्री शिंदेंची अक्कलच काढली

सुभाष देसाईंनी मुख्यमंत्री शिंदेंची अक्कलच काढली

मुंबई : आजच्याच दिवशी 12 मार्च 1992 या दिवशी मुंबईमध्ये प्रचंड बॉम्बस्फोट (Mumbai Bombblast) झाले. त्यामध्ये आपले मुंबईकर बांधव हुतात्मे झाले. वल्गना केल्या गेल्या की आम्ही दाऊदला (Daud) फरपटत आणू असं करु तसं करु, काही झालं नाही, पण त्यामध्ये प्राण गमावलेल्या मुंबईकरांप्रती आपल्या संवेदना आजही जाग्या आहेत. म्हणून आपण सर्वजण त्यांना मनोमन श्रद्धांजली वाहूया. एक गोष्ट इथं नमूद केलं पाहिजे की, या बॉम्बस्फोटच्या आधी जी दंगल झाली होती, त्या जातीय दंगलीमध्ये मुंबईला आणि मुंबईकरांना कोणी वाचवलं असेल तर ते शिवसेनेनं (Shivsena). त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाही टोला लगावला. ते म्हणाले की, या विद्वानांना देशाचे पंतप्रधान कोण आणि राष्ट्रपती कोण याच्यातीलही फरक कळत नाही, ते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान द्रौपदीताई मुर्मू ही यांची अक्कल. आणि शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रश्न विचारला तर निवडणूक आयोगाला (Election Commission)विचारावं लागेल ही यांची बुद्धी, त्यामुळं हे काही टीकणार नाही, असाही टोला ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई (Subhash Desai)यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. गोरेगाव येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणात शिवर्जना यात्रेत बोलत होते.

खरंतर शिवसेनेनं मुंबईला दोनदा वाचवलं. एकदा या दंगलीच्यावेळी अनेकजण मुंबई सोडून जाण्याच्या तयारीला होते, त्यांना अभय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलं असंही यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई म्हणाले. शंकराने तिसरा डोळा उघडावा तसा हिंदूंना आता तिसरा डोळा उघडावा लागेल असा इशारा बाळासाहेबांनी दिला. आणि ते उग्र रुप पाहिल्यानंतर जातीयवादी दंगेखोरांचे धाबे दणाणले आणि त्यांनी काढता पाय घेतला. त्यानंतर ही मुंबई वाचली.

गुलाबराव पाटलांनी सांगितलं उद्धव ठाकरेंना सोडण्याचं कारण…

दुसऱ्यांदा शिवसेनेनं ही मुंबई वाचवली ती मुख्यमंत्री असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कोरोनाच्या संकटातून मुंबईला वाचवलं. सगळं जग आणि देश गोंधळून गेलं असताना आणि आपल्याकडंसुद्धा कोरोनाच्या संकटाची सज्जता नसताना उद्धव ठाकरेंनी हिंमत गाळा केली. सर्वांना कामाला लावलं. अवघे सहा हजार आयसीयु बेड संपूर्ण महाराष्ट्रात नव्हते. आणि गरज हजारोंची लाखांची होती. त्यावर लवकरच ती संख्या 4 लाखांच्या पुढं गेली.

ऑक्सिजन पाहिजे तर ऑक्सिजन मिळवला, रेमडिसीवर पाहिजे तर ते मिळवलं, औषध पाहिजे तर ते मिळवलं. सगळ्या पद्धतीची सज्जता करुन मुंबईकरांना वाचवलं. धारावीसारख्या स्फोट होऊ शकणाऱ्या ठिकाणाला बंदोबस्तात ठेवलं. हे पाहूनचं कौतुकाचा वर्षाव आपल्या शासनावर झाला. जागतिक आरोग्य संघटनेनं भरभरुन कौतुक केलं. इतर राज्यांनाही समज दिली की, कोरोनाचा बंदोबस्त तुम्हाला जमत नसेल तर महाराष्ट्राकडे पाहा असं सांगितलं. असं चांगलं काम करणाऱ्या सरकारला तुम्ही दगा देता. तुमचं वर्णन काय केलं जातं की, खोके खोके सरकार, अशी टीका सुभाष देसाईंनी केली.

एका विद्वानानं सांगितलं की, एक वटहुकूम काढा की खोके खोके म्हणण्यावर बंदी घाला. या विद्वानांचा भरोसा नाही, विद्वानच आहेत सगळी. या विद्वानांना देशाचे पंतप्रधान कोण आणि राष्ट्रपती कोण याच्यातीलही फरक कळत नाही, ते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान द्रौपदीताई मुर्मू ही यांची अक्कल. आणि शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रश्न विचारला तर निवडणूक आयोगाला विचारावं लागेल ही यांची बुद्धी, त्यामुळं हे काही टीकणार नाही, असाही टोला ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी लगावला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube