अजित पवारांना न सांगता बिहारमध्ये उमेदवार? प्रफुल पटेल म्हणाले, पक्षाचे संघटन…

Praful Patel On Bihar Elections : बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्याने

Praful Patel On Bihar Elections

Praful Patel On Bihar Elections

Praful Patel On Bihar Elections : बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांवर विरोधक जोरदार हल्लाबोल करत आहे. तर दुसरीकडे यावर बोलताना मी बिहारमध्ये उमेदवार देऊ नका असं सांगितलं होतं असा खुलासा अजित पवार (Ajit Pawar) यांनी केल्यानंतर आता यावर राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल पटेल यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. बुलढाणा येथे बोलताना त्यांनी काही निर्णय स्थानिक स्तरावर होत असतात असं म्हणत सावरासावर करण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रफुल पटेल (Praful Patel) म्हणाले की, बिहारच्या स्थानिक लोकांनी ठरवलं, पक्षाचा कुठंही आग्रह नव्हता. आम्ही कुठंही प्रचाराला गेलो नाही. आमचा कुठेही आग्रह नव्हता की, आमचा उमेदवार उभा करा पण, स्थानिक स्तरावर काहीना काही पक्षाचे जे संघटन असतात त्यात लोकांची इच्छा राहतेचं, लोकल लेव्हलवर त्यांनीच निर्णय घेतला. पण, आमच्या पक्षश्रेष्ठीकडून काही विशेष तिथे काही लक्ष घातलं नाही, अशी सावरासावर केली.

तर दुसरीकडे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीने (Mahayuti) स्वबळावर लढण्याचा विचार केला आहे. काही काही ठिकाणीच जमल्यास महायुतीमध्ये अलायन्स होऊ शकते. पण, महायूतीच्या तिन्ही पक्षाने आम्ही निर्णय केलेला आहे, सगळ्या पक्षांमध्ये कार्यकर्ते खूप उत्सुक असतात. 9 वर्षानंतर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि स्वाभाविक आहे की इच्छुकांची खूप मोठी गर्दी असते. तिन्ही पक्ष एकत्र लढल्यास कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकणार नाही. त्यासोबतच स्थानिक स्तरावर काही वेगवेगळी परिस्थिती होऊ शकते. त्यामुळे तिथला निर्णय तिथेच घ्यावं लागते. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील निवडणुका आम्ही स्वबळावरच लढत आहे. एखाद ठिकाणी कुठे तडजोड करायचा प्रसंग आल्यास आम्ही तसं तडजोड करू, असं देखील प्रफुल पटेल म्हणाले.

ओरिजनल क्लायमॅक्ससह ‘या’ दिवशी 1500 स्क्रीनवर रि- रिलीज होणार शोले

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने शानदार कामगिरी करत 243 पैकी 202 जागांवर विजय मिळवला आहे तर महाआघाडीला फक्त 35 जागांवर विजय मिळवता आला आहे. तर या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 16 जागांवर उमेदवार दिले होते मात्र सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना 21, 43 असं मते मिळाली आहे.

Exit mobile version