Download App

आरक्षणाच्या मुद्द्यावर आगीत तेल ओतण्यासाठी शरद पवार मैदानात, प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

डॉ. प्रकाश आंबेडकर सध्या आरक्षण बचाव मोर्चाच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधत आहेत. त्यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे.

  • Written By: Last Updated:

Prakash Ambedkar Comment on Sharad Pawar : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख (Prakash Ambedkar) प्रकाश आंबेडकर यांनी आता शरद पवारांना लक्ष केलं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आता आगीत तेल ओतण्यासाठी (Sharad Pawar) शरद पवार उतरले आहेत अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी नामांतराच्या मुद्द्यावरुन शरद पवारांवर टीका केली आहे. आरक्षण बचाव रॅली लातूरमध्ये होती. त्यावेळी उपस्थितांशी ते बोलत होते.

 इतकी वर्ष नेतृत्व करेल असं वाटलं नव्हत भारताचा स्टार टेनिस खेळाडू रोहन बोपन्नाची निवृत्तीची घोषणा

ठरवून हवा देत आहेत

शरद पवार आरक्षणाच्या मुद्द्यावर आता तेल ओतण्यासाठी उतरले आहेत. शरद पवार आगीत तेल ओतत आहेत. नामांतराचा मुद्दा काढण्याचं कारण काय? नामांतर होऊन इतकी वर्षे झाली आहेत. फुले, शाहू, आंबेडकरवादी यांना उचकवण्यासाठी तो मुद्दा काढला आहे का? हा मुद्दा आत्ता उपस्थित करुन शरद पवार यांना काय साध्य करायचं आहे? नामांतराचा मुद्दा बऱ्याच वर्षांपूर्वीचा होता. त्या मुद्द्याला शरद पवार ठरवून हवा देत आहेत. राज्यातील पुरोगामी विचारांच्या लोकांना उचकवण्याचं काम ते या माध्यमातून करत आहेत. असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला.

टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्राने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू

288 लढाव्यात 

मनोज जरांगे यांनाही प्रकाश आंबेडकरांनी सल्ला दिला आहे. विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगेंनी २८८ जागा लढवल्या पाहिजेत, त्यांची मागणी मान्य झाली नाही तर त्यांनी हा पर्याय स्वीकारला पाहिजे. सर्वसामान्य मराठ्यांना न्याय देण्यासाठी, त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी मनोज जरांगेंनी २८८ जागांवर निवडणूक लढवली पाहिजे. राज्यातील श्रीमंत मराठा समाज गरीब मराठ्यांचे प्रश्न दाबून टाकतो आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर मनोज जरांगेंनी निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी लातूरमधून त्यांना दिला आहे.

 

follow us