Prakash Ambedkar : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा पेटला आहे. मनोज जरांगेंनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली तर ओबीसी नेत्यांनी जरांगेंच्या या मागणीला विरोध केला. आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा आणि ओबीसीमध्ये तीव्र संघर्ष पेटला असतांना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी वादग्रस्त विधान करून खळबळ उडवून दिली आहे.
‘…तर ठाकरे सीएम व्हावेत यासाठी मी सगळा माहोल तयार केला असता’; एकनाथ शिंदेंचं मोठं विधान
जोपर्यंत लोक धर्मांतरण करत नाहीत तोपर्यंत आरक्षणाला धोका नाही, असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं.
आंबेडकरांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. गृह मंत्रालयाने 45 जागांसाठी काढलेल्या जाहिरातीवरही आंबेडकर यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, एससी, एसटी आणि ओबीसींना त्यांच्या घटनात्मक अधिकारांपासून वंचित ठेवण्याचे भाजपचे मॉडेल असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यामुळे भाजप-आरएसएस बाबासाहेबांच्या कार्याचा तुकड्या – तुकड्याने पुसून टाकत असल्याची टीका त्यांनी केली. तर ही 45 पदे पार्श्वभरतीऐवजी UPSC परीक्षेद्वारे भरली असती तर 6 पदे SC, 3 ST आणि 12 OBC प्रवर्गात गेली असती. जोपर्यंत लोक धर्मांतरण करत नाहीत, तोपर्यंत आरक्षण धोक्यात नसल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
‘मला अटक करण्याचे वरून आदेश होते, परमबीर सिंह यांच्या दाव्यात तथ्य’, CM शिंदेंचा खुलासा
भाजप-आरएसएस हे आरक्षण विरोधी
भाजप-आरएसएस हे आरक्षण विरोधी आहेत, ते बाबासाहेबांची विचारधारा एक एक करून नष्ट करण्याचे काम करत आहेत. अशा चुकीच्या धोरणांविरोधात 20 ऑगस्ट रोजी नागपुरात वंचित बहुजन आघाडीच्या एल्गार सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आंबेडकरांनी दिली.
100 ओबीसी आमदार निवडून आणा
ओबीसी आरक्षण वाचवायचे असेल तर विधानसभेत 100 ओबीसी आमदार निवडून आणणे गरजेच आहे, असंही आंबेडकर म्हणाले. जोपर्यंत 100 चा आकडा गाठत नाहीत, तोपर्यंत आरक्षण धोक्यात आहे, असं ते म्हणाले. यावेळी आंबेडकरांनी शरद पवारांवरही निशाणा साधला. 225 समाजाचे उमेदवार निवडून येतील, असं स्टेटमेंट पवारानी केलं. यानंतर वातावरण चिघळळंय, असा गंभीर आरोप आंबेडकरांनी पवारांवर केला.