पंकजा मुंडेंची बदनामी करण्यासाठी भाजपमधूनच कारस्थान पण…, प्रकाश महाजन असं का म्हणाले?

Prakash Mahajan On Pankaja Munde :  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे दिवंगत नेते

Prakash Mahajan On Pankaja Munde

Prakash Mahajan On Pankaja Munde

Prakash Mahajan On Pankaja Munde :  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे.  यावर बोलताना शिवसेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी देखील मोठा दावा केले आहे. ज्या पद्धतीने गोपीनाथ मुंडे  यांना भाजपमध्ये त्रास देण्यात आला, त्याचप्रमाणे पंकजा मुंडे यांना देखील भाजपमध्ये त्रास देण्यात आल्याचा दावा शिवसेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी केला आहे.

लेट्सअप मराठीशी बोलताना शिवसेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) म्हणाले की, पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची बदनामी करण्यासाठी भाजपमधूनच (BJP) अनेक कारस्थानं रचली गेली होते मात्र त्यात त्यांना काही यश मिळाले नाही. चिक्की घोटाळ्यातून (Chikki Scam) त्यांची बदनामी करण्यात आली मात्र त्यात देखील काही निष्पन्न झालं नाही. मंत्री असताना पंकजा मुंडे यांनी अनेक चांगली कामे केली आहे. ग्राम विकासमध्ये ऑनलाईन पद्धतीने बदल्या केल्या. पंकजा मुंडे अत्यंत पारदर्शक आणि चांगल्या पद्धतीने काम करत आहे असं लेट्सअप मराठीशी बोलताना प्रकाश महाजन म्हणाले.

तसेच राजकारणात नेहमी मैत्री दाखवली जाते, स्पर्धक दाखवला जात नाही. त्यामुळे भाजपमध्ये पंकजा मुंडे यांना एक पर्याय नेतृत्व उभा करण्याचे प्रयत्न झाले मात्र त्यात देखील अपयश आले असल्याचा दावा प्रकाश महाजन यांनी केला आहे.

तर दुसरीकडे काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी फक्त माध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत वक्तव्य केले. जो इतिहास आहे तो सगळ्यांना माहिती आहे असेही प्रकाश महाजन म्हणाले.

धनुष्यबाण चिन्ह गोठणार? आज ठाकरे गटाकडून अंतिम युक्तिवाद

तर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे पुन्हा एकदा एकत्र आले ही चांगली गोष्ट आहे. आता दोघेही मिळून परळीच्या विकासासाठी प्रयत्न करत आहे. दोघांचे वडील हयात नाहीत त्यामुळे दोघांना एकमेकांच्या आधाराची खूप गरज आहे असेही प्रकाश महाजन लेट्सअप मराठीशी बोलताना म्हणाले.

Exit mobile version