नबीन यांच्या टीममध्ये वर्णी लागताच भाजपकडून तावडेंना आणखी एक मोठी जबाबदारी
Vinod Tawde appointed In-charge Of UP भाजपने ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांची उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.
BJP National President Nitin Nabin Appointed New State In Charges : भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. नवीन राष्ट्रीय संघटनात्मक टीम स्थापन केल्यानंतर, पक्षाने आज (दि.18) तीन राज्यांच्या नवीन प्रभारींचीही घोषणा केली आहे. यात विनोद तावडे यांची उत्तर प्रदेशचे, सतीश पुनिया यांची पंजाबचे आणि तरुण चुघ यांची गुजरातचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील वर्षी या तिन्ही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. काल (दि.17) भाजपने तावडे यांची राष्ट्रीय महासचिवपदी नियुक्ती केली होती. तर, सतीश पुनिया यांचीही राष्ट्रीय महासचिवपदी नियुक्ती केली होती. तर, राज्यसभा खासदार तरुण चुघ यांची राष्ट्रीय कार्यालय प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दोन दिवसांत दोन याद्या जाहीर झाल्याने, भाजपने 2027 च्या विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
