Shiv Sena Symbol Supreme Court Hearing : धनुष्यबाण चिन्ह गोठणार? आज ठाकरे गटाकडून अंतिम युक्तिवाद

Shiv Sena Symbol Supreme Court Hearing : शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च  न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे.

Shiv Sena Symbol Supreme Court Hearing

Shiv Sena Symbol Supreme Court Hearing : शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च  न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. आज ठाकरे गटाच्या वकीलांकडून अंतिम युक्तिवाद करण्यात येणार असल्याने सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत ठाकरे गटाकडून वकील कपिल सिब्बल यांनी गेल्या पाच सुनावणीत बाजू मांडली आहे. काल झालेल्या युक्तिवादात त्यांनी शिवसेना पक्ष चिन्ह धनुष्यबाण गोठवण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे आज ठाकरे गटाकडून देवदत्त कामत युक्तिवाद करणार आहे. 30-35 मिनिटे आज देवदत्त कामत युक्तिवाद करणार आहे.

राजकीय पक्ष वेगळा आणि विधिमंडळ पक्ष वेगळा असल्याचा दावा काल झालेल्या युक्तिवादादरम्यान ठाकेर गटाकडून करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने आणि महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी केवळ विधिमंडळातील संख्याबळाच्या आधारावर एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला असल्याचा दावा देखील सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

विधानसभा अध्यक्षांनी आणि निवडणूक आयोगाने विधिमंडळाच्या संख्याबळावर निकाल दिल्याने शिवसेना पक्ष चिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात यावे किंवा आम्हाला देण्यात यावे अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.  प्रकरण न्यायालयात असताना देखील निवडणूक आयोगाने निर्णय दिला. विधिमंडळ पक्षाने एकनाथ शिंदे यांना नेता निवडलं. निवडीच पत्र राज्यपालांना दिल पण शिवसेना हा पक्ष ठाकरेंचा पक्ष आहे असं काल झालेल्या सुनावणी दरम्यान कपिल सिब्बल म्हणाले. तसेच जर धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या आणि आम्हाला मिळत नसेल तर गोठवा. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पण कोणत्या पक्षातून असं देखील न्यायालयात कपिल सिब्बल म्हणाले.

लाडकी बहीण योजना, तब्बल 92 लाख महिला अपात्र; धक्कादायक आकडेवारी समोर

तर दुसरीकडे आज होणाऱ्या सुनावणी दरम्यान ठाकरे गटाकडून अंतिम युक्तिवाद देवदत्त कामत करणार आहे. यानंतर शिंदे गटाच्या वकिलांना युक्तिवाद करण्याची संधी मिळणार आहे. आतापर्यंत झालेल्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद करत अनेक प्रश्न न्यायालयासमोर उपस्थित केले आहे.

follow us