Pranali Barad : राज्यातील महिलांसाठी शिंदे सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना (Mukhyamantri Ladki Bahin Yojna) आणण्यात आलीयं. या योजनेच्या माध्यमातून महिलांना महिन्याला 1500 रुपये देण्यात येणार आहेत. लाडक्या बहिणीचे पैसे काही महिलांनी स्वत:साठी खर्च केले तर काही महिलांनी व्यवसायात गुंतवलेत. पण एका लाडक्या बहिणीने थोडंस् डोकं लावून लाडक्या बहिण योजनेच्या दीड हजार रुपयांत व्यवसाय सुरु करुन दहा हजार रुपये कमवले आहेत.
प्रणाली बारड (Pranali Barad) असं या लाडक्या बहिणीचं नाव असून तिच्या खात्या 17 तारखेलाच मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले. तिने या पैशांमधून आपला छोटासा व्यवसाय सुरु करण्याच निर्णय घेत इन्टाग्रामवर ट्रेंडिग असलेल्या घुंगरु कडी तिने गणेशोत्सवासाठी खरेदी केले. त्यातूनच तिला ही कल्पना सुचल्याचं खुद्द प्रणालीने सांगितलं.
हाजी अराफत शेख यांच्याशी आमचे चांगले संबंध; ‘त्या’ वक्तव्याच्या वादावर नितेश राणेंचं पांघरुण
सध्या गणेशोत्सव काळ सुरु आहे. अशातच गणरायाच्या आरतीसाठी वाजवल्या जाणाऱ्या घुंगरु कडीची मागणी जोरात होती. त्याचवेळी प्रणालीने घुंगरु कडीचा व्यवसाय सुरु केला. प्रणाली एवढ्यावरच थांबली नाही तर तिने घुंगरु कडी व्यवसायाची ब्रॅंडिंग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात केली. गणेशोत्वाच्या तोंडावर घुंगरु कडी ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होत असल्याने गणेशभक्तांनी ऑर्डरचा पाऊसच पाडला. फक्त ऑनलाईनच ग्राहक नाही तर घुंगरु कडीच्या विक्रीसाठी प्रणालीने मुंबईतील लालबाग मार्केट, स्वामी मठ, आणि गौरीशंकर बाजारपेठेत नेऊनही विकल्या आहेत. अवघ्या काही दिवसांतच तिला दीड हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर दहा हजार रुपयांची कमाई केलीयं. तिच्या खात्यात मुख्यमंत्री लाडकी योजनेचे तीन हजार रुपये जमा झाले होते. त्यातील दीड हजार रुपयांची प्रणालीने गुंतवणूक केली होती.
अंगी कला असेल तर तुम्हीही व्यवसाय करु शकता…
जर तुमच्या अंगी काही कला असेल तर तुम्ही सोशल मीडियावर संपर्कातील लोकांना माहिती देऊन त्यांच्यापर्यंत पोहोचवून व्यवसाय वाढवू शकता. सोशल मीडियावर हिंमत दाखवून मार्केटिंगमध्ये उतरुन मराठी माणसाने व्यवसाय सुरु करायला हवा, असं आवाहन प्रणाली बारड हिने माध्यमांशी बोलताना केलंय.