Video : पु्ण्यात गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून बळाचा वापर; काहीकाळ तणाव
पुणे : पुण्यात गणपती विसर्जन मिरवणूक सुरू होऊन 24 तासांहून अधिकचा वेळ झाला आहे. मात्र, त्यानंतर अजूनही अनेक मंडळांच्या गणपतींचे विसर्जन होणे बाकी आहे. यामुळे मध्य पुण्यातील रस्ते वाहतुकीसाठी अद्यापही बंदच ठेवण्यात आले असून, यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या सर्व घडमोडींमध्ये गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी बळाचा वापर केल्याने काहीकाळ पुण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (Pune Ganpati Visarjan Miravnuk Update)
गणपती विसर्जनाची धामधूम अन् पुण्यातील ‘या’ भागात गोळीबार
का केला पोलिसांनी बळाचा वापर?
पुण्यात काल (दि.17) सकाळी उत्साहात गणुपती विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली. मानच्या पाच गणपतींचे विसर्जन साधरण रात्री 8 वाजेच्या सुमारास पूर्ण झाले. त्यानंतर श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे पांचाळेश्वर घाटावर रात्री 9 वाजण्याच्या सुमारास विसर्जन पूर्ण झाले. विसर्जनाला दरवर्षी होणाऱ्या विलंबामुळे गेल्या वर्षापासून दगडूशेठ मंडळाने दुपारी 4 वाजता मिरवणुकीला सुरूवात करण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार यावर्षीदेखील मंडळाने 4 वाजत मिरवणुकीला सुरूवात केली. मात्र, पुण्यातील प्रमुख मंडळांच्या गणपतींचे विसर्जन वेळेत पूर्ण होऊन एक दिवस उलटल्यानंतरदेखील पुण्यात अद्यापही विसर्जन मिरवणुका सुरू आहेत.
Accident : पुण्यात तर्राट वाहनचालकाचा प्रताप; थेट चंद्रकांतदादांच्या गाडीलाच ठोकलं
एकाच जागेवर डीजे वाजवणाऱ्यांना पोलिसांकडून चोप
एकीकडे मध्य पुण्यातील रस्ते गणपती विसर्जनामुळे बंद ठेवण्यात आल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असतानाच अलका चौकाच्या पुढे एक सार्वजनिक गणेश मंडळ रस्त्यावर एकाच जागेवर उभे राहून डीजे वाजवत होता. यावेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांकडून वारंवार सांगूनही हे मंडळं पुढे मार्गस्थ होत नव्हते. त्यामुळे अखेर पोलिसांनी ऐकत नसलेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी चोप दिला. यानंतर या ठिकाणी काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.