Pratap Sarnaik On ST Bus : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती (Mahayuti) सरकारने एसटी प्रवासात महिलांना 50 टक्के सवलत आणि जेष्ठ नागरिकांना सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र काही दिवसांपुर्वी धाराशिवमध्ये एका कार्यक्रमात बोलताना राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी या सवलतीमुळे एसटी तोट्यात जात असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर लवकरच महायुती सरकार एसटी प्रवासात महिलांना आणि जेष्ठ नागरिकांना देणारी सवलत बंद करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र आता यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
माध्यमांशी बोलताना, एसटी महामंडळाच्याबाबतीत आणि राज्याच्या हिताच्या अनुषंगाने मुख्यमंत्री म्हणुन कार्यरत असताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जे काही निर्णय घेतले आहे त्यात कोणताही बदल होणार नाही तसेच ज्या योजना एकनाथ शिंदे यांनी सुरु केले आहे त्या योजनेत कोणताही बदल करण्यात येणार नसल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. तसेच तेव्हा 75 वर्षांच्या पुढील जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाचा निर्णय झाला होता. आता देखील या निर्णयात कोणताही बदल होणार नसल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील स्पष्टीकरण देत महिलांना एसटीच्या प्रवासात मिळणारी सवलत तसेच लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. याचबरोबर जेष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत देखील सुरु राहणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती.
नेमकं काय म्हणाले होते प्रताप सरनाईक ?
महिला आणि ज्येष्ठांना एसटी प्रवासात सवलत देण्यात आली. यामुळे एसटीला दर दिवशी 3 कोटी रुपयांचा तोटा होतो आहे. त्यामुळे यापुढे एसटीमध्ये कोणतीच सवलत नाही. लाडक्या बहिणींना बस मध्ये 50% सवलत, ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस या सवलतीमुळे परिस्थिती अशी झाली आहे. अशीच सवलत आपण जर सर्वांना देत बसलो तर मला असं वाटतं महामंडळ चालवणं कठीण होईल.
MG Hector वर तब्बल 2.40 लाखांचा डिस्काउंट, खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
तसेच गाव खेड्यापर्यंत एसटी पोहोचली पाहिजे. ज्या भागात एसटी जात नाही, त्या भागात एसटी पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे असं या कार्यक्रमात बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले होते.