धंगेकर शिंदे गटात प्रवेश करणार का? सामंत म्हणाले, ‘एकनाथ शिंदेंशिवाय पर्यायच नाही…’

  • Written By: Published:
धंगेकर शिंदे गटात प्रवेश करणार का? सामंत म्हणाले, ‘एकनाथ शिंदेंशिवाय पर्यायच नाही…’

Uday Samant On Ravindra Dhangekar : काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेटली घेतली होती. त्यानतंर शनिवारी त्यांनी गळ्यात भगवे उपरणे घातलेले स्टेटस ठेवले होते. त्यामुळं धंगेकर हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. अशातच मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी धंगेकरांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली. मी कालच धंगेकरांना पक्षात येण्याचं निमंत्रण दिल्याच सामंत यांनी म्हटलं.

नगर जिल्ह्याचा बिहार झालाय, अतिक्रमण मोहिमेविरोधात खासदार लंकेंचा संताप 

तसेच धंगेकरांना ताकदीने काम करायचं असेल तर तर एकनाथ शिंदेंशिवाय पर्याय नाही, असंही सामंत म्हटलं.

उदय सामंत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्यं केलं. धंगेकरांच्या व्हॉट्सअप स्टेट्सविषयीय विचारलं असता ते म्हणाले की, धंगेकर यांनी काल त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर गळ्यात भगवं उपरणं घातलेला फोटो ठेवला होता, असं मी पाहिलं. त्याबाबत मी काल बोललो की, या उपरण्यावर धनुष्यबाण आला तर आम्हाला आवडेल. तसेच मी कालच रवींद्र धंगेकर यांना पक्षात निमंत्रण दिलं आहे. कारण त्यांच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जर ताकदीने काम करायचं असेल आणि सामाजिक क्षेत्रात काम करायचं असेल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशिवाय पर्याय नाही, असं मी त्यांना निमंत्रण दिलेलं आहे, असं सामंत म्हणाले.

PMT ने फिरणाऱ्या नीलम गोऱ्हेंकडे आज महागड्या साड्या अन् सोन्याचे मॅंचिग नेकलेस…; सुषमा अंधारेंनी सगळचं काढलं 

शनिवारी सामंत नक्की काय म्हणाले?

धंगेकर यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसबाबत बोलताना सामंत यांनी शनिवारी (२२ फेब्रुवारी) म्हटलं होतं की, मला असं वाटतं की, रवींद्र धंगेकरांनी गळ्यात भगवं उपरणं ठेवलं असेल आणि त्यावर जर भविष्यात धनुष्यबाण आला तर आम्हाला सर्वाना आनंद होईल. दरम्यान, रवींद्र धंगेकर यांच्या स्टेटसबाबत सामंत यांनी दिलेल्या सूचक प्रतिक्रियेनंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

धंगेकराचं स्टेट्स काय होतं?

धंगेकर यांनी त्यांच्या स्टेट्सवर गळ्यात भगवं उपरणं घातलेला एक फोटो ठेवला होता. तसेच त्या स्टेट्सला ‘तेरे कदमो के तले मिट्टी भी सोना बन गयी, जर हुआ दुश्मन जहॉं शमशीर तेरी तन गयी…’ हे गाणं ठेवलं होतं. त्यामुळं रवींद्र धंगेकर यांच्या स्टेटसची चर्चा रंगली. तसेच ते कॉंग्रेस सोडणार असल्याच्या चर्चांनी उधाण आलंय.

दरम्यान, या सर्व चर्चांवर बोलताना धंगेकर म्हणाले, माझा सध्या व्हायरल होणारा फोटो हा शिवजयंतीमधील फोटो आहे. तो मी चांगला वाटला म्हणून स्टेट्सला ठेवला. गळ्यात भगवा घालणं यात गैर काय आहे?, असा सवाल धंगेकरांनी केला. तसेच एकनाथ शिंदेंकडे माझं कामं होतं, त्यामुळं त्यांची भेट घेतली, असंही धंगेकर म्हणाले.

सामंत यांनी दिलेल्या ऑफरवर धंगेकर बोलतांना माझा स्वभाव चांगला आहे. त्यामुळं ऑफर देणं काही चुकीचं नाही, असं धंगेकर म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube