Download App

तुमच्या कौटुंबिक वादामुळे महाराष्ट्र का उध्वस्त करता? पंतप्रधान मोदींचा ठाकरे-पवारांवर घणाघात

पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यामध्ये महाराष्ट्रातील सरकार मुंबई शहर आणि ठाकरे पवार कुटुंबावरही भाष्य केल.

  • Written By: Last Updated:

PM Narendra Modi Interview : महाराष्ट्रात गेल्या काही काळात कोणत्याही मुख्यमंत्र्याने पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केलेला नाही. तसंच, सातत्याने युती किंवा आघाडीचे सरकार येथे आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासात बाधा आली असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत (PM Narendra Modi) बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं.

 

महाराष्ट्रातील जनतेचा सकारात्मक प्रतिसाद

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने त्या शहराचा झपाट्याने विकास होण गरजेचं आहे असंही मोदी यावेळी म्हणाले. तसंच, देशाच्या हितासाठी महाराष्ट्र भक्कमपणे पुढे जायला हवा असं म्हणत आम्ही महाराष्ट्रातील लोकांपर्यंत आमची ही भावना घेऊन पोहोचवत आहोत असंही मोदी म्हणाले. त्याचबरोबर, यावबाबत महाराष्ट्रातील लोकांचा आम्हाला खूप सकारात्मक प्रतिसाद आहे असा दावाही त्यांनी यावेळी केला.

 

शिवसेनेवर केलं भाष्य

जे लोक आच्यासोबत मिळून लढले. तसंच ज्यांनी आमच्यासोबत लढून महाराष्ट्राच्या लोकांना मत मागितली त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी आपल्या व्यक्तिगत महत्वकांक्षेसाठी आणि अहंकारी वृत्तीमुळे बाळासाहेब ठाकरेंपासून जोडलेल्या जोडीला धोका दिली अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेवर भाष्य केलं. तसंच, याबद्दल लोकांमध्ये शिवसेनेबद्दल राग आहे तर भाजपबद्दल सहानुभूती आहे असंही मोदी यावेळी म्हणाले. त्याचबरोबर तुम्ही कुटुंबातील लोकांनाच प्राधान्य देता तेव्हा कधी ना कधी अडचण निर्माण होतेच असंही मोदी यावेळी म्हणाले.

 

राष्ट्रवादीवरही केलं भाष्य

आज शरद पवारांच्या घरात जी अडचण आहे ती कौटुंबीक वादाची आहे. येथे स्व:ची मुलगी पुढं यावी की सक्षम व्यक्ती पुढ यावा असा प्रश्न आहे. म्हणजे पुतण्या सांभाळायचा की मुलगी अशी ही परिस्थिती आहे. जस काँग्रेसमध्ये सुरू आहे तसं हा वाद आहे असंही मोदी यावेळी म्हणाले आहेत. मला वाटत आपला देश कौटुंबीक वादाचा तिरस्कार करतो. त्यामुळे कौटुंबीक वाद तुम्ही घरात सोडवा. त्यामुळे महाराष्ट्राला का उद्वस्त कराता असं म्हणत याचा लोकांमध्ये मोठा राग आहे असा दावाही मोदींनी यावेळी केला. तसंच, याबाबत कुणी सहानुभूती मिळवायचा प्रयत्न केला तर तो अयशस्वी ठरेल असंही ते म्हणाले आहेत.

follow us