आमदारांच्या डोक्यावर भोपळे; सरकारी बजेटविरोधात महाविकास आघाडीचे अनोखे आंदोलन

आमदारांच्या डोक्यावर भोपळे; सरकारी बजेटविरोधात महाविकास आघाडीचे अनोखे आंदोलन

Maharashtra Budget 2023: बजेटमध्ये मिळाला भोपळा.. महाराष्ट्राला मिळाला भोपळा.. बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा…बजेट म्हणजे रिकामा खोका.. सर्वसामान्यांना मिळाला भोपळा.. सत्तेत कामी आले खोके, सर्वसामान्यांना मात्र धोके.. अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पाचा निषेध केला. यावेळी आमदारांनी हातात भोपळा घेतल्याचे दिसून आले.

हे सुद्धा वाचा : दीड लाख रोजगारांचे गिफ्ट गुजरातला दिले, एफडीआयही घटला; रोहित पवारांनी बजेटआधी सरकारला घेरले

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा आठवा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या नेतृत्वाखाली अर्थसंकल्पावर जोरदार निदर्शने केली.

Maharashtra Budget : विमानतळ, मेट्रो, रिंग रोड आणि…. बजेटमध्ये पुण्याला काय काय मिळाले?

राष्ट्रवादीचे आमदार भोपळा डोक्यावर घेऊनच शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विधानभवनाच्या परिसरात दाखल झाले. त्यानंतर पायर्‍यांवर आंदोलन केले.

दरम्यान, राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला. या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षांकडून टीका केली जात आहे. हा अर्थसंकल्प निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन केलेला जुमला आहे, अशी टीका केली जात आहे. तर आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाबाहेर हाती भोपळे घेत आंदोलन केले. सरकारने या बजेटमध्ये ज्या घोषणा केल्या आहेत. जी आश्वासने दिली आहेत तो एक भ्रमाचा भोपळा असल्याचे सांगत विरोधकांनी निदर्शने केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube