Public meeting of Sujay Vikhe and MLA Sangram Jagtap for BJP-NCP candidates : अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-राष्ट्रवादी युतीचा प्रचार जोरात सुरू असून शहरातील विविध प्रभागांमध्ये सभा, रॅली आणि मतदार संवाद कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडत आहेत. आज दिल्ली गेट येथे प्रभाग क्रमांक 9, 11 आणि 15 मधील भाजप-राष्ट्रवादी युतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यात आली. सभेच्या सुरुवातीस महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह स्थानिक नेत्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. शहराच्या विकासाची गती कायम ठेवण्यासाठी आणि प्रलंबित नागरी प्रश्न मार्गी लावण्यासाठी युतीचे सर्व उमेदवार निवडून येणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दिल्ली गेट परिसरातील नागरिकांनी दाखवलेला उत्साह पाहता युतीच्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्याची भावना नेत्यांनी व्यक्त केली.
भोसरीत मुख्यमंत्री फडणवीसांची सभा; स्वागतासाठी उडवलेल्या फटाक्यांमुळे इमारतीला भीषण आग
दरम्यान, प्रभाग क्रमांक 17 (केडगाव) येथे भाजप-राष्ट्रवादी युतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या प्रचाराची सुरुवात श्री गणेश मंदिरात दर्शन घेऊन करण्यात आली. या वेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह युतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीदरम्यान केडगाव परिसरातील घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला. ठिकठिकाणी नागरिकांनी केलेले स्वागत आणि उत्स्फूर्त प्रतिसादामुळे युतीवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले. केडगावच्या सर्वांगीण विकासासाठी जनता भाजप-राष्ट्रवादी युतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे नेत्यांनी सांगितले.यावेळी भाजप-राष्ट्रवादी महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन करण्यात आलं.
