Puja Khedkar : वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकरबाबत (Puja Khedkar) आणखी एक बातमी समोर आली आहे. दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court) पूजा खेडकरने दाखल केलेली याचिका निकाली काढली आहे. या प्रकरणात उचित प्राधिकाऱ्यांकडे अपील दाखल करण्याची मुभा याचिकाकर्त्यांना देण्यात आली आहे. सुनावणी दरम्यान पूजा खेडकरच्या (Pooja Khedkar) वकिलांनी आयएएस पद रद्द करण्याची कोणतीही माहिती युपीएससीने दिली नाही. सरळ प्रेसनोट काढण्यात आली असा युक्तिवाद केला.
पूजा खेडकर यांचं आयएएस पद (UPSC) रद्द केलं होतं तर या निर्णयाची माहिती देण्यासाठी पत्र पाठवणं गरजेचं होतं असेही वकिलांनी सांगतिले. यावर युपीएससीने प्रतिवाद करत स्पष्ट केले की त्यावेळी पूजा खेडकर नेमक्या कुठे होत्या याची माहिती नव्हती. त्यामुळेच आम्ही सरळ एक पत्रक काढलं होतं. आता पुढील दोन दिवसांत आम्ही पूजा खेडकरला एक मेल आणि त्यांच्या शेवटच्या पत्त्यावर माहिती पाठवू असे केंद्रीय लोकसेवा आयोगाने सुनावणीदरम्यान सांगितले. यानंतर उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली.
Pooja Khedkar : UPSC च्या कारवाईत फोलपणा? गुन्हा दाखल झाला पण वेगळ्याच कारणासाठी
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर कार्यालयात राजेशाही वागण्यापासून ते बोगस अपंगत्व प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र जोडल्याचे विविध आरोप त्यांच्यावर आहेत. या प्रकरणी पंतप्रधान कार्यालय, कार्मिक मंत्रालय, केंद्रीय लोकसेवा आयोग, मसुरी येथील लाल बहाद्दूर शास्त्री अकादमी अशा सर्वांनी अहवाल मागविला होता. यापूर्वी राज्य शासनाने सादर केलेल्या सविस्तर अहवालाच्या आधारे लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीने परत बोलावून घेतले. राज्य शासनानेही त्यांना तातडीने कार्यमुक्त केले होते. यानंतर यूपीएससीने त्यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला होता.
पुढील टप्प्यात अटकपूर्व जामीनासाठी पूजा खेडकर यांनी दिल्ली पटियाला हाऊस कोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर मागील आठवड्यात सुनावणी झाली. पूजा खेडकरच्या वकिलांचा युक्तिवाद न्यायालयाने ऐकला. निर्णय देताना अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. यानंतर पूजा खेडकरने थेट यूपीएससीलाच कोर्टात खेचलं होतं. दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालयाने ही याचिका देखील आता निकाली काढली आहे.
पूजा खेडकरने सगळ्यांनाच कोर्टात खेचलं; UPSC पासून राज्य सरकापर्यंत एकालाही नाही सोडलं
केंद्रीय लोकसेवा आयोग आता पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांचं आयएएस पद रद्द का केलं? याची माहिती दोन दिवसांत पूजा खेडकर यांना देणार आहे. यासाठी ई मेल आणि पूजा खेडकर राहत असलेल्या शेवटच्या पत्त्यावर सविस्तर माहिती पाठवणार आहे. आता यूपीएससी (UPSC) काय माहिती देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.