Puja Khedkar: गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळे चर्चेत राहणाऱ्या पूजा खेडकरबाबत (Puja Khedkar) एक मोठी बातमी समोर आली आहे. माहितीनुसार, पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे (Suhas Diwase) पूजा खेडकर यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असणाऱ्या पूजा खेडकर यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर पूजा खेडकर यांनी लैंगिक छळाचा गंभीर आरोप केला होता. याबाबतची तक्रार पूजा खेडकर यांनी यूपीएससी (UPSC) आणि पोलिसांकडे (Police) देखील केली होती. पुणे जिल्ह्याधिकारी कार्यालयात प्रशिक्षण कालावधीत सुहास दिवसे यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप पूजा खेडकर यांनी केला आहे.
पूजा खेडकर यांनी वाशीम पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी लैगिंक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. सुहास दिवसे यांच्या विरोधात असणारी तक्रार वाशिम पोलिसांच्या कार्यकक्षेत येत नसल्याने ही तक्रार पुणे पोलीसांकडे वर्ग करण्यात आली होती. या आरोपांची चौकशीसाठी पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांनी तीनदा समन्स बजावले मात्र तरीही पूजा खेडकर हजर झालेले नाही.
तर आता समोर आलेल्या माहितीनुसार, पूजा खेडकर यांच्या या आरोपांविरोधात पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे पूजा खेडकर यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे.
पूजा खेडकर फरार ?
काही दिवसापूर्वी पूजा खेडकर यांना यूपीएससीने मोठा धक्का देत आयएएस पद काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर पूजा खेडकर फरार झाले आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार पूजा खेडकर भारतातून थेट परदेशात पसार झाली आहे. मात्र याबाबत कोणतीही यूपीएससीने आयएएस पद काढून घेतल्यानंतर आता दुसरीकडे न्यायालयानेही पूजा खेडकरला दणका दिला आहे.
शानदार, विनेश फोगटची उपांत्यपूर्व फेरीत धडक, गतविजेत्याला दाखवलं आसमान
पूजा खेडकर गेल्या काही दिवसांपासून फरार आहे. न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर पूजा खेडकर दुबईला पळून गेल्याची चर्चा आहे.अधिकृत माहिती समोर आलेली नाही.