Download App

Punyashlok Ahilya Devi Holkar : ‘मी जे बोलतो तेच करतो’ म्हणत शिंदेंची चौंडीमध्ये मोठी घोषणा

Punyashlok Ahilya Devi Holkar : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 जयंती निमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौंडीमध्ये आयोजित

Punyashlok Ahilya Devi Holkar : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Ahilya Devi Holkar) यांच्या 299 जयंती निमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी चौंडीमध्ये (Chaundi) आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलताना एक मोठी घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आम्ही अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावर ठेवला आहे. अहमदनगरचा अहिल्यानगर होणार असं मी गेल्या वर्षी म्हटलो होतो, मी जो बोलतो तेच करतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

या कार्यक्रमात पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचा उमेदवार अर्ज भरण्यासाठी मी वाराणसीमध्ये गेलो होते तिथेही अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा आहे हे पाहून अभिमान वाटले. महाराष्ट्राच्या कन्या असलेल्या अहिल्याबाई होळकरांचे कर्तुत्व केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभरात आहे. समाजसेवेचा हिमालय म्हणजे अहिल्यादेवी. अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याचा भाग्य आम्हाला मिळालं. यासाठी आमदार राम शिंदे आणि गोपीचंद पडळकर यांनी सतत पाठपुरवठा केला होता, सरकार बदलल्यानंतर आपण नामांतर करू शकलो असं देखील यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

डॉ. तावरेला क्लीनचिट देण्याचा प्रयत्न होतोय; रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप

तसेच महायुतीचे सरकार सामान्यांचा शेतकऱ्यांचे सरकार आहे. सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे. महायुतीचे शेतकऱ्यांना 16000 कोटींची नुकसान भरपाई देणार आहे. आज शेतकऱ्यांसाठी महायुतीचे सरकार अनेक योजना राबवत आहे. पुढच्या वर्षी अहिल्यादेवींची 300 जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करणार असल्याची घोषणा देखील या कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदेंनी केली.

follow us