Download App

Radhakrishna Vikhe : शिल्लक मावळे टिकवण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादीची धडपड; विखेंची खोचक टीका

Radhakrishna Vikhe : सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये सातत्याने एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप तसेच टीका टिपण्णी सुरु असते. नुकतेच राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेना व राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. शिवसेना-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये बंड होऊन आमदार बाहेर पडले आहे. त्यामुळे आता दोन्ही पक्षात राहिलेले आमदार देखील अस्वस्थ आहे. यातच उरलेले आमदार तरी टिकून राहावे व ते सोडून जाऊ नये यासाठी आता राष्ट्रवादी व शिवसेना या दोन्ही पक्षांची धडपड सुरु आहे. असे म्हणतच विखे यांनी शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ( Radhakrishna Vikhe criticize Udhav Thackery and NCP )

PM Modi In Pune : मोदींचे पुण्यात आगमन ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळा, पाहा खास फोटो

राहुरी तालुक्यातील उंबरे या गावात घडलेल्या घटनेनंतर नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व भाजप आमदार प्रसाद लाड यांनी उंबरे गावात भेट दिली. दरम्यान तो दौरा आटपून मंत्री विखे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आले असता त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. यावेळी बोलताना विखे यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवरून विरोधकांवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी (शरद पवार गट) व शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्यावर जोरदार टीका केली.

‘मंत्रीपद नसल्याने हा माणूस बिथरला’; ठाकरे गटाचा नेता शिरसाटांवर भडकला

शिवसेनेमध्ये बंड होऊन एकनाथ शिंदे आमदारांसह बाहेर पडले व सत्तेत सहभागी झाली. त्यानंतर राष्ट्रवादीचा मोठा गट अजित पवार यांच्यासोबत बाहेर पडला. त्यामुळे दोन्ही पक्षातील ज्येष्ठ नेते उद्धव ठाकरे व शरद पवार हे अस्वस्थ झाले आहे. याच मुद्द्यावर बोलताना विखे म्हणाले, उद्धव ठाकरे हे माझे कुटुंब माझी जबाबदारी याच्या पलीकडे गेले नाही. त्यामुळेच त्यांच्याकडे कुटुंबच शिल्लक राहिले नाही. तसेच राष्ट्रवादीची अवस्था देखील तशीच आहे.

त्यामुळे उरले – सुरले मावळे तरी आपल्यासोबत राहिले पाहिजे यासाठी या दोन्ही पक्षाची धडपड सुरु आहे, अशी खोचक टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. यामुळे तर टीका करण्याचं काम करत आहे. मात्र त्यांच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. हे ट्रिपल सरकार इंजिन सरकार आहे ते अधिक गतिमानाने काम करत आहे, असे यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहे.

Tags

follow us