Radhakrishna Vikhe Patil : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले मात्र त्यांच्या मृत्यूनंतर अनेक तर्कवितर्क लावले जाऊ लागले. तसेच अनेकांनी यावर शंका देखील उपस्थित केल्या. यावर आता राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे. याबाबतचा अंतिम अहवाल येईपर्यंत आपण वाट पहिली पाहिजे. त्यानंतर सर्व गोष्टींचा उलगड होईल मात्र काही जण यामध्ये राजकारण करत आहे. मात्र अशा दुर्दैवी घटनेचे राजकारण करू नये असा सल्ला देखील राज्याचे मंत्री विखे यांनी दिला आहे.
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती विमान दुर्घटनेनंतर तपास यंत्रणांनी आता निर्णायक टप्प्यात प्रवेश केला आहे. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा मानला जाणारा ब्लॅक बॉक्स अखेर तांत्रिक पातळीवर तपासासाठी सक्रिय करण्यात आला असून त्यातील माहिती रिकव्हर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या घडामोडीमुळे अपघाताच्या नेमक्या कारणांबाबत स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता वाढली आहे. तपास यंत्रणांकडून अत्यंत दक्षतेने आणि प्रोटोकॉलनुसार ही प्रक्रिया राबवली जात असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान याच गोष्टीवर मंत्री विखे यांनी देखील भाष्य केले आहे.
ते म्हणाले, राज्य सरकारने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहे. त्या ब्लैक बॉक्समध्ये काय रिकॉर्डिंग झाले आहे तसेच वैमानकांचे नेमके शेवटच्या टप्प्यात काय संभाषण झाले हे सगळ्याच उलगडा होईल. याबाबत घाईगडबडीने काही बोलणे उचित नाही . या सगळ्या गोष्टींचा टपस होऊन अंतिम अहवाल हाती येऊ द्या. तसेच काही लोक यामध्ये राजकारण करत मात्र घडलेली घटना दुर्दैवी असून यावर कोणी राजकारण करू नये असा सल्ला मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिला.
विमान अपघातानंतर घटनास्थळावरून मिळालेल्या अवशेषांमध्ये ब्लॅक बॉक्स सुरक्षित अवस्थेत सापडल्याने तपासाला मोठी दिशा मिळाली होती. मात्र, त्यातील डेटा उघडणे ही अत्यंत संवेदनशील आणि तांत्रिक प्रक्रिया असल्याने ती विशेष तज्ञांच्या देखरेखीखाली सुरू करण्यात आली आहे.
काय सांगता! UPI पेंमेंटसह मोबाईलचे सर्व काम करणार ‘हे’ ग्लासेस; जाणून घ्या फीचर्स
ब्लॅक बॉक्समध्ये विमानाच्या उड्डाणादरम्यानची सर्व तांत्रिक माहिती, इंजिनची स्थिती, पायलट आणि कंट्रोल रूममधील संवाद, तसेच शेवटच्या क्षणांतील नोंदी साठवलेल्या असतात. त्यामुळे या डेटाचे विश्लेषण अपघाताच्या मूळ कारणांचा शोध घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
